या अभिनेत्याने 2500 रुपयांमध्ये विकलेले कुत्रे खरेदी केले 10 लाखांना


हॉलिवूडचा सुपरस्टार सिलवेस्टर स्टेलॉनच्या स्टाईल आणि अ‍ॅक्शनचे लाखो चाहते आहेत. भारतात देखील त्याच्या फॅन्सची संख्या कमी नाही. रॅम्बो सिरीजद्वारे सिलवेस्टरने जगभरात लोकप्रियता मिळवली. मात्र तुम्हाला माहिती आहे का? एक वेळ अशी होती, जेव्हा सिलवेस्टरकडे घराचे भाडे देण्यासाठी देखील पैसे नव्हते.

करिअरच्या सुरूवातीच्या काळात सिलवेस्टरने खुप संघर्ष केला. अनेक वेळा रात्री न्युयॉर्कच्या बस स्टॅंडवर रात्र काढली. एवढेच नाही तर एकदा त्याच्याकडे खाण्यासाठी पैसे नव्हते तेव्हा त्याने त्याचा आवडता कुत्रा Butkus ला 40 डॉलर म्हणजेच केवळ 2500 रुपयांमध्ये विकले होते. कुत्र्याला विकल्यानंतर सिलवेस्टर रडत घरी गेला होता. तो त्याच्या आयुष्यातील सर्वात कठीण काळ होता. सिलवेस्टरसाठी तो काळ एवढा वाईट होता की, त्याने बायकोचे दागिने चोरण्याचा देखील प्रयत्न केला होता.

मात्र त्याचा काळ बदलला. सिलवेस्टरने त्यावेळी प्रसिध्द बॉक्सर मोहम्मद अली आणि चक वेपनर यांच्यात झालेल्या लढतीतुन प्रेरणा घेत रॉकी चित्रपटाची स्क्रिप्ट लिहिली. या स्क्रिप्लटला त्याने केवळ 20 तासात लिहिले होते. याच चित्रपटानंतर त्याची वेळ बदलली.

एका प्रसिध्द प्रॉडक्शन हाऊने सिल्वेस्टरची ही स्क्रिप्ट 17 लाख रुपयांमध्ये खरेदी करण्याचा निर्णय घेतला. मात्र सिल्वेस्टरने त्यांच्या समोर अट ठेवली की, चित्रपटात हिरोची भुमिका तोच साकारणार. मात्र तु खुप फनी दिसतो म्हणुन त्या प्रोडक्शन हाऊने ती अट मान्य केली नाही.सिल्वेस्टरला या गोष्टीचे खुप वाईट वाटले व त्याने स्क्रिप्ट देण्यास नकार दिला. काही दिवसानंतर त्याच प्रोडक्शन हाऊसने सिल्वेस्टरशी संपर्क करत 6 लाख अधिक देत स्क्रिप्ट देण्याची मागणी केली. मात्र सिल्वेस्टरची हिरोची अट देखील मान्य केली. यानंतर चित्रपटामध्ये सिल्वेस्टरने प्रमुख भुमिका केला. या चित्रपटाने अनेक रेकॉर्ड केले.

यश मिळाल्यानंतर सिल्वेस्टरने ज्या दुकानावर आपले कुत्रे विकले होते त्या दुकानाच्या अनेक चक्करा मारल्या. शोध घेतल्यानंतर अखेर ते कुत्रे मिळाले. मात्र त्याच्या नवीन मालकाने त्यासाठी 10 लाख रुपयांची मागणी केली. सिल्वेस्टरने देखील हसत हसत ती मागणी मान्य केली. एका मुलाखतीमध्ये सिल्वेस्टरने सांगितले की, 1981 मध्ये त्याच्या लाडक्या कुत्र्याचा मृत्यू झाला.

Leave a Comment