राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या प्रमुखपदी राहुल द्रविडची निवड


मुंबई – बीसीसीआयने राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या प्रमुखपदी ‘द वॉल’ या नावाने ओळखला जाणाऱ्या राहुल द्रविडची नियुक्ती केली असल्यामुळे भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार असलेल्या द्रविडच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.


याबाबत माहिती देताना बीसीसीआयने म्हटले आहे, राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या प्रमुखपदी द्रविडची निवड करण्यात आली असून द्रविड अकादमीमध्ये नव्या खेळाडूंना प्रशिक्षण देण्याचे काम करणार आहे. त्याचबरोबर क्रिकेटसंबंधित इतर कार्यक्रमही तो पाहणार आहे’. सध्या अंडर-19 भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी द्रविड कार्यरत आहे.

बीसीसीआयने म्हटल्याप्रमाणे, पुरुष आणि महिला क्रिकेट संघांच्या प्रशिक्षकांसोबत द्रविड काम करणार आहे. शिवाय, तो अंडर-19, अंडर-23 संघांच्या प्रशिक्षकपदाचीही जबाबदारी सांभाळेल. 2016 पासून भारताच्या अंडर-19 संघाचा द्रविड प्रशिक्षक आहे. त्याच्या मार्गदर्शनाखाली, या संघाने 2018 चा विश्वचषक जिंकला होता.

Leave a Comment