कंगनाच्या ‘धाकड’चे नवे पोस्टर तुमच्या भेटीला


जजमेंटल है क्या या चित्रपटानंतर बॉलीवूडची क्वीन अर्थात कंगना राणावत ही धाकड या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे नवे पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. या चित्रपटात कंगना धाकड अवतारात दिसणार आहे.


पोस्टरवरील कंगनाच्या दोन्ही हातात मशीनगन असून शत्रूवर ती तुटून पडलेली दिसते. चाहत्यांसाठी तिचे हे आक्रमक रूप आश्वासक वाटत आहे. रजनीश रेझी घई यांनी या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली असून याचे सोहेल मकलई निर्माते आहेत. या चित्रपटाचे शूटींग पुढील वर्षाच्या सुरूवातीला सुरू होईल आणि धाकड दिवाळीत प्रेक्षकांच्या भेटीस येईल. चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी शेअर केले आहे.

Leave a Comment