जग फिरण्यासाठी पासपोर्ट आणि व्हिसा अत्यंत महत्त्वपुर्ण आहे. मात्र काही देशांचे पासपोर्ट एवढे शक्तीशाली असतात की, जग फिरण्यासाठी काहीही अडचण येत नाही. हेनले पासपोर्ट इंडेक्सने या वर्षीची यादी जाहीर करत, सर्वात शक्तीशाली पासपोर्ट कोणत्या देशाचा आहे ते सांगितले आहे. या यादीनुसार जापान आणि सिंगापूर या देशांचा पासपोर्ट सर्वात शक्तीशाली आहे. या देशांच्या पासपोर्टवरून 189 देशांमध्ये विना व्हिसा प्रवास केला जाऊ शकतो. भारत या यादीमध्ये 86 व्या स्थानावर आहे.
तुम्हीही करू शकता विना पासपोर्ट आणि व्हिसा 58 देशांचा प्रवास
ही यादी देशांचा पासपोर्ट किती शक्तीशाली आहे त्यावर निर्धारित असते. ज्या देशाच्या पासपोर्टवर विना व्हिसा सर्वात अधिक देशांचा प्रवास करता येतो, तो पासपोर्ट सर्वात शक्तीशाली समजला जातो. या यादीत अंतिम स्थानावर नेपाळ, फिलीस्तान, सुदान, यमन, पाकिस्तान, सोमालिया, सिरिया, अफगाणिस्तान आणि इराक हे देश आहेत.
जाणून घेऊया कोणत्या देशाचा पासपोर्ट कोणत्या क्रंमाकावर आहे –
- सर्वात शक्तीशाली पासपोर्टच्या यादीत पहिल्या स्थानावर जापान आहे. कोणताही जापानी नागरिक आपल्या पासपोर्टवर जगातील सर्वात जास्त देशात विना व्हिसा प्रवास करू शकतो.
- जापान देशाचा नागरिक तब्बल 190 देशांमध्ये विना व्हिजाचा प्रवेश करू शकतो. यामध्ये भारत, श्रीलंका, चीन, ऑस्ट्रेलिया, इंडोनेशिया, न्युझीलंड या देशांचा समावेश आहे.
- पाकिस्तान या यादीत खुप मागे असून, त्यांचा क्रमांक 106 आहे. त्यांच्या पासपोर्टवर 30 देशात विना व्हिसा प्रवास करता येऊ शकतो.
- 2014 मध्ये प्रथम क्रमांकावर असलेले अमेरिका आणि ब्रिटन हे देश यंदा 6 व्या स्थानावर आहेत.
- रशिया 47 व्या क्रमांकावर आहे. त्यांच्या नागरिकांना 119 देशांमध्ये जाण्यासाठी व्हिसा अनिवार्य आहे. तर 119 देशांमध्ये ते विना व्हिसा प्रवास करु शकतात.
- 199 देशांच्या या यादीत अफगाणिस्तान सर्वात शेवटच्या क्रमांकावर आहे.
- इराक आणि अफगाणिस्तान यांचा पासपोर्ट सर्वात कमजोर असून, त्यांच्या पासपोर्टवर केवळ 30 देशात व्हिसा शिवाय प्रवास केला जाऊ शकतो.
- या वर्षाच्या सुरूवातीला भारत 79 व्या क्रमांकावर होता. आता भारत 86 व्या क्रमांकावर असून, भारतीय नागरिक 58 देशांमध्ये व्हिसा शिवाय प्रवास करु शकतो.
- प्रथम 20 मध्ये समावेश होऊन युएईने मोठी झेप घेतली आहे. 2006 मध्ये युएई 62 व्या क्रमांकावर होता.
- यंदाच्या यादीत अनेक फेरबदल झाले आहेत. दक्षिण कोरिया आणि जर्मनी हे देश खाली घसरले आहेत.
भारतीय पासपोर्ट असेल तर या देशात विना व्हिजा प्रवास करता येईल –
- थायलंड
- मॉरिशस
- एक्वाडोर
- ब्रिटिश वर्जिन आईलँड्स
- कुक आयलँड्स
- भुतान
- सेशेल्स
- डोमिनिका
- हैती
- अलसल्वाडोर
- कंबोडिया
- टोगो
- बोलिविया
- सेंट लूसिया
- फिजी
- मालदीव
- केनिया
- गुयाना
- जमैका
- माइक्रोनेसिया
- मकाऊ
- तंजानिया
- सेंट किट्स एंड नेविस
- वनुआतु
- इंडोनेशिया
- इथोपिया
- सेंट विंसेंट
- समोआ
- ईराक
- मडागास्कर
- ग्रेनाडा
- तुवालु
- नेपाळ
- मोजाम्बिक
- त्रिनिदाद एंड टोबागो
- नियू
- लाओस
- युगांडा
- मोंसेरत
- पलाऊ
- जॉर्डन
- गिनिया बिसाउ
- निकरागुआ
- तिमोर लेसे
- केप वर्डे
- टर्क्स एंड कैकस
- कोमोरस आईलैंड्स
- झिम्बाब्वे
- साओ टोम एंड प्रिंसिप
- रवांडा
- मलेशिया
- जॉर्जिया
- गैबन
- एंटीगुआ एंड बारबुडा
- कोट डी’आइवर
- बहरीन
- म्यान्मार
- ताजिकिस्तान
पासपोर्ट का आवश्य आहे ?
भारताच्या बाहेर जाणारे अथवा जाण्याची इच्छा असणाऱ्यांकडे एक वैध पासपोर्ट असणे आवश्यक असते. पासपोर्ट अधिनियम 1967 अंतर्गत भारत सरकार यात्रेसंबंधी विविध प्रकारचे पासपोर्ट देते, जसे की, सामान्य पासपोर्ट, सरकारी पासपोर्ट, आपातकालीन प्रमाणपत्र हे व्यक्तीची ओळख व्हावी यासाठी गरजेचे असते.
सर्वात पहिला पासपोर्ट कधी बनला होता ?
पासपोर्ट सुरू करण्याचे श्रेय इंग्लंडचे राजा हेनरी पंचम यांना दिले जाते. त्यांनी पहिल्यांदा ओळख पत्राची सुरूवात केली, ते आज पासपोर्ट म्हणुन ओळखले जात आहे. या प्रकारच्या कागदाचे सर्वात प्रथम वितरण 1414 मध्ये संसदीय अधिनियमाच्या स्वरुपात मिळते. त्याच वेळी पासपोर्ट या शब्दाचा वापर करण्यात आला होता.
सुरक्षेच्या कारणामुळे पासपोर्ट –
19 व्या शतकात रेल्वेच्या शोधानंतर युरोपमध्ये प्रवाश्यांची संख्या वाढू लागली. त्यामुळे लोकांची ओळख होण्यासाठी कोणतीच सोय नव्हती. पहिल्या विश्वयुध्दात राष्ट्रीय सुरक्षेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले. त्यानंतर पासपोर्टची आधुनिक व्यवस्था तयार करण्यात आली.
पासपोर्टचे रंग आणि त्याचे अर्थ –
भारताचा पासपोर्ट हा निळ्या रंगाचा आहे. मात्र याशिवाय जगात अनेक रंगाचे पासपोर्ट आहेत. जगात लाल, निळा, हिरवा आणि काळा अशा चार रंगाचे पासपोर्ट आहेत.
भारतीय पासपोर्ट –
निळा रंग हा शांतीचा प्रतिक आहे. त्याचबरोबर सी -4 करार झालेले देश निळ्या रंगाचा पासपोर्ट वापरतात. त्याच बरोबर 15 कॅरेबियन देश सुध्दा निळ्या रंगाचा पासपोर्ट वापरतात. दक्षिण अमेरिकी देशांचा पासपोर्टचा रंग मरकॉसुर नावाच्या ट्रेंड युनियन बरोबर असलेल्या संबंधाचे प्रतिक आहे. यामध्ये ब्राझील, अर्जेंटिना, पेरुग्वे या देशांचा समावेश आहे. अमेरिकेने 1976 मध्ये निळ्या रंगाचा पासपोर्ट स्विकारला.
लाल रंगाचा पासपोर्ट –
जेथे साम्यवादी विचारांचा इतिहास आहे अथवा जेथे साम्यवादी सिस्टिम आहे. त्या देशांनी लाल रंगाचा पासपोर्ट स्विकारला आहे. सल्वेनिया, चीन, सर्बिया, रशिया, लात्विया, रोमानिया, पोलांड आणि जॉर्जियाच्या नागरिकांकडे लाल रंगाचा पासपोर्ट आहे. क्रोशियासोडून युरोपिन युनियनच्या देशांकडे देखील लाल रंगाशी मिळता जुळता पासपोर्ट आहे. याशिवाय युरोपियन युनियनमध्ये समावेश होण्याची इच्छा असणारे तर्की, मखदुनिया आणि अल्बेनिया या देशांनी काही वर्षापुर्वी लाल रंगाचा पासपोर्ट स्विकारला आहे. तसेच, बोलिविया, कोलंबिया, अक्कॉडर आणि पेरू यांचा देखील पासपोर्ट लाल आहे.
हिरव्या रंगाचा पासपोर्ट –
हिरव्या रंगाला पैगंबर मोहम्मद यांचा आवडता रंग समजला जात असल्याने मुस्लिम देश जसे की, सऊदी अरब आणि पाकिस्तान यांच्या पासपोर्टचा रंग हिरवा आहे. हिरव्या रंगाला निर्सग आणि जीवनाचे प्रतिक समजले जाते. त्यामुळे पश्चिम अफ्रिकी देश जसे की, बुर्किना फासो, नायजेरिया, नाइजर, आइवरी कोस्ट आणि सिनेगल या देशांच्या पासपोर्टचा रंग हिरवा आहे.
काळ्या रंगाचा पासपोर्ट –
काळ्या रंगाचा पासपोर्ट असणारे खुप कमी देश आहेत. अफ्रिकेतील बोत्सवना, जांबिया, बुरुंडी, गैबन, अंगोली, कॉन्गो, या देशांचा पासपोर्ट काळा आहे. न्युझीलंडचा राष्ट्रीय रंग काला आहे. त्यामुळे त्यांचा पासपोर्ट देखील काळा आहे.
एक देशात अनेक वेगवेगळे पासपोर्ट –
जगातील काही देश आपल्या देशातील राजकीय नेते, अधिकारी, सरकारशी संबंधित लोक यांच्यासाठी वेगळे पासपोर्ट देत असतात. ज्यामुळे पासपोर्टच्या रंगाने त्या व्यक्तीचे पद आणि ओळख पटकन लक्षात यावी. भारतात देखील तीन प्रकारचे पासपोर्ट आहेत. गडद लाल रंगाचा डिप्लोमॅटिक पासपोर्ट, पांढऱ्या रंगाचा अधिकृत पासपोर्ट आणि निळ्या रंगाचा सामान्य पासपोर्ट असे तीन पासपोर्ट आहेत.