खराब झालेला नवीन मोबाईल कंपनीने दुरुस्त न केल्यास करा हे काम


नवी दिल्ली : मोबाईल विकत घेताना त्याचे बिल दुकानदार अथवा कंपनीकडून नक्की घ्यावे. अन्यथा मोबाईल खराब झाल्यावर दुरूस्त करण्यासाठी मोबाईल शो रुममध्ये चकरा माराव्या लागतात. सध्या याच्याशी संबंधित एक प्रकरण रायपूरच्या ग्राहक मंचाकडे आलेले आहे. रायपूरच्या गुढियारी परिवादी शरफराज खानने 18 सप्टेंबरला 2016 ला मायक्रोमॅक्सचा क्यू 413 हा मोबाईल खरेदी केला होता. मात्र चार दिवसाच्या आतच हा मोबाईल खराब झाला.

याची तक्रार करत एनएसआर कम्युनिकेशन, पगारिया कॉम्प्लेक्स सर्विस सेंटरमध्ये मोबाईल दुरुस्तीसाठी देण्यात आला. त्यानंतर देखील एक आठवड्याच्या आत मोबाईल पुन्हा खराब झाला. असे वारंवार झाले तरी देखील मोबाईलमध्ये कोणतीच सुधारणा झाली नाही.

यानंतर हे प्रकरण ग्राहक मंचाकडे गेले. तेथे मंचाचे अध्यक्ष उत्तरा कुमार कश्यप, सदस्य प्रिया अग्रवाल यांनी या प्रकरणाची चौकशी केली. यामध्ये समोर आले की, मोबाईल वारंवार खराब झाला आहे. मात्र तरी देखील सर्विस सेंटरमध्ये मोबाईल दुरूस्त झालेला नाही. त्यामुळे मोबाईलची किंमत 6400 रुपये, त्याचे आर्थिक व्याज, मानसिक नुकसान भरपाई 3000 रुपये आणि अन्य 2000 रुपये ग्राहकाला देण्यात यावे, असा निर्णय झाला.

त्यामुळे जर तुमचाही नवीन मोबाईल खराब झाला असेल व तो कंपनीमार्फत दुरूस्त केला जात नसेल, तर त्याची तक्रार ग्राहक मंचाकडे केली जाऊ शकते.

Leave a Comment