कॉर्पोरेट क्षेत्राकडून सहा राजकीय पक्षांनी घेतल्या कोट्यावधींच्या देणग्या


नवी दिल्ली – कॉर्पोरेट क्षेत्राकडून राजकीय पक्षांना सर्वाधिक देणग्या देण्यात आल्या असून 93 टक्के एवढे हे प्रमाण आहे. कॉर्पोरेट क्षेत्राकडून देशातील सहा राजकीय पक्षांनी कोट्यवधींची रक्कम स्वीकारल्याचे अहवालात म्हटले आहे.

देशातील विविध 1 हजार 731 कॉर्पोरेट कंपन्यांकडून भारतीय जनता पक्षाने 915.59 कोटी रुपये स्वीकारले आहेत. तर कॉर्पोरेट कंपन्यांकडून देशातील सर्व राजकीय पक्षांना 1 हजार 59 कोटी रुपयांची देणगी देण्यात आली आहे. असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सने (एडीआर) याबाबतचा अहवाल प्रसिद्ध केला. विविध 151 कॉर्पोरेटकडून काँग्रेसला कंपन्यांकडून 55.36 कोटी रुपये मिळाले आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला विविध 23 कॉर्पोरेट क्षेत्रांकडून 7.74 कोटी देणगी मिळाली आहे. सर्वात कमी म्हणजे 2 टक्के देणग्या कम्युनिस्ट पक्षाला (सीपीआय) मिळाल्या आहेत.

विविध 76 संस्थांकडून राष्ट्रीय पक्षांना 2.59 कोटींच्या देणग्या मिळाल्या आहेत. त्यांच्या पॅन क्रमाकांची कोणतीही माहिती उपलब्ध नाही. भाजपला मिळालेल्या 2.50 कोटींच्या देणग्या देणाऱ्यांचे पत्ते आणि पॅन क्रमांक उपलब्ध नाहीत. देशातील सहा राष्ट्रीय पक्षांना 22.59 कोटींच्या 347 देणग्या कॉर्पोरेट कंपन्यांकडून मिळाल्या आहेत. मात्र त्यांचा इंटरनेटवर ठावठिकाणाही नाही. ते काय काम करतात, याबाबत शंका असल्याचे एडीआरने म्हटले आहे.

Leave a Comment