मुस्लीमच करत आहेत ‘हज यात्रा’ बंद करण्याची मागणी


दुबई : मुस्लिमांसाठी हज यात्रा पवित्र मानली जाते. प्रत्येक मुस्लीम बांधवाची आयुष्यात एकदा तरी हज यात्रा करावी अशी इच्छा असते. पण, हज यात्रेला आता जगातील मुस्लिमांनी विरोध करायला सुरूवात केली आहे. हज यात्रा आणखी सोपी करण्यासाठी सौदी अरेबियाचे राजे प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी प्रयत्न केले. पण, त्यानंतर देखील आता हज यात्रेला सुरूवात झाली आहे. पण हज यात्रेला जगभरातील मुस्लिमांनी दर्शवलेल्या विरोधानंतर आता आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

सध्या सौदी अरेबियामध्ये अंतर्गत कलह सुरू आहे. जो काही निर्णय सध्या सौदीचे राजा घेत आहेत काही मुस्लिमांचा आणि धार्मिक संघटनांचा त्याला विरोध असल्यामुळे हज यात्रेवर बहिष्कार घालावा अशी मागणी एक वर्षभरापासून जोर धरू लागली आहे. हज यात्रेवर बहिष्काराची मागणी एप्रिलमध्ये लिबियातील प्रसिद्द मौलवी मुफ्ती सादिक अल – घरीआनी यांनी केली. त्यानंतर बहिष्काराच्या मागणीला आणखी जोर चढला.

दरम्यान, सौदी अरेबियाच्या गंगाजळीमध्ये हज यात्रेमुळे मिळणाऱ्या पैशांतून वाढ होते. तर, दहशतवादासाठी या पैशांचा वापर केला जात असल्याचा आरोप लिबियातील प्रसिद्द मौलवी मुफ्ती सादिक अल – घरीआनी यांनी केला. या पैशातून शस्त्र खरेदी करून त्यांचा वापर हा लिबिया, ट्यनेशिया, सुदान, अल्जेरियामध्ये दहशत पसरवण्यासाठी केला जात असल्याचा आरोप देखील केला जात आहे. सध्या हज यात्रेवरील बंदीची मागणी ट्विटरवर देखील ट्रेंड होत आहे. त्यासाठी #boycotthajj वापरले जात आहे.

Leave a Comment