या भारतीय मुलीने बुद्धीमत्तेत आइनस्टाइन आणि हॉकिंग यांनाही पछाडले


अल्बर्ट आइनस्टाइन आणि स्टीफन हॉकिंग यांना जगात सर्वाधिक हुशार समजले जाते. मात्र भारताच्या 11 वर्षीय मुलीने यांना देखील मागे टाकले आहे. अनुष्का दिक्षीत नावाच्या मुलीने आयक्यू टेस्टमध्ये अल्बर्ट आइनस्टाइन आणि स्टीफन हॉकिंग यांना देखील मागे सोडले आहे. अनुष्काने मेसा आयक्यू टेस्टमध्ये 162 अंक मिळवले आहेत. या टेस्टचे हे सर्वाधिक अंक आहेत. अल्बर्ट आइनस्टाइन  आणि स्टीफन हॉकिंग यांचा आयक्यू अंक 160 होता. मात्र या मुलीने त्यापेक्षाही दोन अंक अधिक मिळवले आहेत.

अनुष्काने पुर्ण पीरियोडिक टेबल केवळ 40 मिनिटात पुर्ण केला आहे. तिची आई सांगते की, ती लहानपणापासुनच हुशार आहे. केवळ 6 महिन्याची असतानाच तिने बोलण्यास सुरुवात केली होती. टिव्हीवर लागणाऱ्या जाहीरातीबघून त्या ती बोलायची. ती केवळ एक वर्षांचीच असताना तिने सर्व देश व त्यांच्या राजधान्या पाठ करण्यास सुरुवात केली होती.

अनुष्का तिच्या आई-वडिलांबरोबर लंडनमध्ये राहते. तिची आई आरती दिक्षित गृहिणी आहे तर वडिल प्रवर्तन अधिकारी आहेत.  अनुष्का सांगते की, टेस्टमध्ये तिला 28 प्रश्न विचारण्यात आले. या प्रश्नांची उत्तरे 4 मिनिटात द्यायची होती. आधी तिला वाटले की, तिने एका प्रश्नाचे उत्तर चुकीचे दिले आहे. मात्र टेस्टचे आकडे आल्यावर तिला सर्वाधिक अंक मिळाले होते. युनिवर्सिटी ऑफ लंडनमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या टेस्टमध्ये अनुष्का सर्वात लहान वयाची परिक्षार्थी होती. तिच्या आजुबाजूचे सर्व लोक 30 ते 60 वर्षांचे होते. अनुष्काचा आवडता विषय इंग्रजी असून, तिला कवीता देखील आवडतात. तिला चांगला डान्स देखील येतो. तिला मोठे होऊन डॉक्टर बनायचे आहे.

Leave a Comment