नागराज मंजुळेद्वारा दिग्दर्शित ‘सैराट’ या चित्रपटामुळे महाराष्ट्रासह देशभरातील घराघरात पोहचलेली आर्ची अर्थात रिंकू राजगुरू चांगलीच चर्चेत आली. रिंकूला पहिल्याच चित्रपटातून मिळालेली ही प्रसिद्धी अनेक मराठी कलाकारांसाठी आर्श्चयाचा धक्का होता.
सोशल मीडियात व्हायरल होत आहे रांगड्या रिंकूचा ग्लॅमरस लूक
रिंकूने यानंतर ‘कागर’ चित्रपटातही भूमिका साकारली, पण तिच्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा म्हणावा असा प्रतिसाद मिळाला नाही. पण त्यामुळे रिंकूच्या लोकप्रियतेत तसूभरही कमी झाली नाही. तिचे चाहते आजही तिच्या एका झलकसाठी रिंकूच्या नवीन फोटोजची आतुरतेने वाट पाहत असतात. अशात आपले ग्लॅमरस लूकमधील अनेक फोटो रिंकूने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.