शाओमीचा स्मार्ट मेकअप मिरर


चीनी कंपनी शाओमीने स्मार्टफोन पासून ते स्मार्ट होम प्रोडक्ट्स पर्यंत विविध उत्पादनांची श्रेणी बाजारात आणण्याचा धडाका लावला असून आता त्यांचे नवे उत्पादन एलइडी स्मार्ट मेकअप मिरर चीन मध्ये लाँच केला गेला आहे. हा आरसा शेंझेन यु लाईफ स्मार्ट कंपनीने तयार केला असून या आरश्यासाठी हीच कंपनी विक्री पश्चात सेवाही पुरविणार आहे. बाजारात आज मितीला अनेक मेकअप मिरर आहेत पण हा आरसा टचस्क्रीन कंट्रोल सह असल्याचा दावा कंपनीने केला आहे.

या आरशात एलइडी बसविले गेले आहेत त्यामुळे तो दिवसाच्या उजेडाइतका म्हणजे ९५ टक्के ब्राईटनेस देतो. या आरश्यात ६.७ इंच हाय डेफिनेशन सिल्व्हर प्लेटेड काचेचा वापर केला गेल्याने तो हाय रिफ्लेक्शन परफॉर्मन्स देतो. या मिररच्या बाजूने एलइडी दिवे आहेत. त्यात तीन प्रकारची म्हणजे कमी, मध्यम आणि ब्राईट लेव्हल वापरता येते. या आरश्यावर अन्य कोणताही रंग नसल्याने तो युजरची क्लीअर, ब्राईट आणि उत्तम प्रतीची छबी दाखवेल असे कंपनीचे म्हणणे आहे.


या आरश्याचे वैशिष्ट म्हणजे याचा खास तच सेन्सिटिव्ह स्विच. याच्या सहाय्याने युजर ब्राईटनेस अॅडजस्ट करू शकेल. या मिररचा एलइडी रिप्लेस करण्याची आवश्यकता नाही. या लाईटचा त्रास युजरच्या डोळ्यांना होणार नाही. या मिररला २००० एमएएच बॅटरी दिली गेली असून ती रिचार्ज करता येते. त्यासाठी मिररच्या बेसमध्ये चार्जिंग केबल दिली आहे. बेस आरश्यापासून सहज वेगळा करता येतो त्यामुळे मिरर कुठेही नेण्यास सोयीचा आहे. या मिररची चीन मधली किंमत १४९ युआन म्हणजे १४८४ रुपये आहे. हा मिरर भारतात व अन्य देशात कधी लाँच होणार याचा खुलासा अद्यापी केला गेलेला नाही.

Leave a Comment