कर्नाटकातील राजकीय हालचालींना वेग


बंगळुरु – कर्नाटकची राजधानी बंगळुरूमध्ये मुख्यमंत्री कुमारस्वामी दाखल झाले असून कर्नाटकातील राजकीय हालचालींना वेग प्राप्त झाला आहे. काँग्रेस आमदारांची ९ जुलैला बैठक होणार आहे. काँग्रेसने यासाठी परिपत्रक काढले आहे. तर मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी धर्मनिरपेक्ष जनता दलाच्या सर्व आमदारांची बैठक बोलावली असून या बैठकीला जे आमदार उपस्थित राहणार नाहीत त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार आहे.

या बैठकीला कर्नाटक काँग्रेसचे प्रभारी केसी वेणुगोपाल आणि कर्नाटक काँग्रेस प्रमुख दिनेश गुंडू उपस्थित राहणार आहेत. सोमवारी सायंकाळी पक्ष कार्यालयात भाजपनेही आमदारांची बैठक आयोजित केली आहे.

शिक्षण मंत्री जी. टी. देवेगौडा यांनी यावर प्रतिक्रिया देताना मी भाजप बरोबर जाणार नाही. आमचे युतीचे सरकार राज्याच्या भल्यासाठी आहे. जर माझ्या पक्षाचे म्हणने असेल तर मी राजीनामा देण्यास तयार असल्याचे म्हटले आहे. दोन्ही पक्षांनी ठरवले असेल तर सिद्धरामय्या मुख्यमंत्री व्हावेत किंवा आणखी कोणी तर मला काहीच अडचण नाही. काँग्रेस सरकार वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहे.

Leave a Comment