टीव्ही जगतातील एक यशस्वी अभिनेत्री म्हणून अभिनेत्री श्वेता तिवारी ओळखली जाते. पण नेहमीच वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत असणाऱ्या श्वेता तिवारीची मुलगी पलक मात्र अभिनय क्षेत्रापासून दूर आहे. स्टार किड्स असूनही स्टारडमपासून दूर असणारी पलक तिवारी सोशल मीडियावर तिच्या ग्लॅमरस फोटोंमुळे खूप चर्चेत असते. पलक काही दिवसांपूर्वी एका टॅक्सीवाल्यासोबत झालेल्या भांडणामुळे सुद्धा चर्चेत आली होती.
भल्याभल्या अभिनेत्रींनी टक्कर देत आहे श्वेता तिवारीची मुलगी
पलकचे नाव स्टार प्लसवरील लोकप्रिय मालिका ‘कसौटी जिंदगी 2’ सुरु होण्याआधी खूप चर्चेत होते. पलकचे नाव या मालिकेतील प्रेरणाच्या भूमिकेसाठी घेतले जात होते. पण नंतर या सर्व अफवा असल्याचे समोर आले.
या सर्व चर्चा अफवा असल्याचे स्वतः अभिनेत्री श्वेता तिवारीने सांगितले होते. डेली सोप्स आवडत पलकला नसल्याने या मालिकेत ती काम करत नसल्याचे तिने स्पष्ट केले होते.
श्वेता तिवारी आणि तिचा पहिला पती राजा चौधरी यांची पलक ही मुलगी आहे. 2008 मध्ये श्वेता आणि राजा यांचा घटस्फोट झाल्यानंतर 2013मध्ये श्वेताने अभिनव कोहलीशी लग्न केले.
सोशल मीडियावर पलक खूप सक्रिय असते. नेहमीच ती तिचे ग्लॅमरस फोटो तिच्या इस्टाग्राम अकाउंटवर शेअर करत असते. स्टारडमपासून दूर असलेल्या पलकचा सोशल मीडियावर स्वतःचा वेगळा चाहता वर्ग आहे.
पलकने काही दिवसांपूर्वीच पिंक कलरचा टॉप आणि ब्लू जीन्समधील एक फोटो शेअर केला होता सोशल मीडियावर ज्याची खूप चर्चा झाली. पलक यामध्ये खूपच ग्लॅमरस दिसत आहे.
तिच्या सोशल मीडियावरील फोटोंवरून पलकचा फॅशन सेन्स खूप चांगला असून ती ग्लॅमरच्या बाबती बॉलिवूडच्याही अभिनेत्रींना टक्कर देत असल्याचे दिसून येते.