बिग बॉसच्या घरातून सुरेखा पुणेकरांची एक्झिट


मागील संपूर्ण आठवड्यामध्ये बिग बॉस मराठीच्या घरात अतिथी देवो भव: हा टास्क रंगला आणि बिग बॉस मराठी सिझन १ मधील सदस्य ज्यामध्ये गेस्ट बनून घरामध्ये आले. नेहाच्या टीमने या टास्कमध्ये बाजी मारली. सुरेखा पुणेकर यांना या आठवड्यात कमी मते मिळाल्यामुळे त्यांना घराबाहेर जावे लागले. हिना पांचाळ, रुपाली भोसले, वैशाली माडे, किशोरी शहाणे आणि सुरेखा पुणेकर हे नॉमिनेशनमध्ये होते. वैशाली माडे आणि सुरेखा पुणेकर हे ज्यामध्ये डेंजर झोनमध्ये होते. पण महेश मांजरेकरांनी अखेर सुरेखा ताईंना घराबाहेर येण्यास सांगितले. संपूर्ण महाराष्ट्राचं मन जिंकणाऱ्या सुरेखा यांनी घरातील स्पर्धकांची आणि प्रेक्षकांचीही मने जिंकली.

त्यांच्याविषयी घरातील सदस्यांच्या मनात नेहमीच आदर होता आणि राहील. सगळेच सदस्य सुरेखाताई घरातून बाहेर पडताना भावुक झाले. सुरेखाताईना सगळ्या सदस्यांनी मानाचा मुजरा केला आणि ही सुरेखा आपल्याला पटलेली आहे, असे म्हटले. घरातील सदस्यांना सुरेखा ताईंनी दिलेले नृत्याचे धडे, त्यांनी सादर केलेली लावणी, मजा- मस्ती, त्यांनी वेळोवेळी दिलेला आधार सदस्यांना घरामध्ये नक्कीच आठवेल. सुरेखा पुणेकरांना यावेळी त्यांच्या आतापर्यंतच्या घरातील प्रवासाची एक सुंदर व्हिडिओ दाखविण्यात आला. सुरेखा ताईंना महेश मांजरेकर यांनी एक विशेष अधिकार दिला ज्यामध्ये त्यांना घरातील एका सदस्याला अनसेफ करायचे होते पण त्यांनी असे करण्यास साफ नकार दिला.

Leave a Comment