वोग मॅगझिनसाठी विकी कौशलने केले फोटोशूट


‘मसान’ चित्रपटाद्वारे बॉलीवूडमध्ये पदार्पण करणारा अभिनेता विकी कौशल सलग उत्तम चित्रपट करून यशाच्या पायऱ्या चढत आहे. त्यातच आता विकीने वोग मॅगझिनसाठी फोटोशूट केले आहे. फोटोशूटचे काही फोटोज विकीने इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.

View this post on Instagram

Soaked in vogue.

A post shared by Vicky Kaushal (@vickykaushal09) on


मॉडेल पूजा मोरसोबतही विकीचे काही फोटोज आहेत. ते यामध्ये शॉवरमध्ये भिजताना दिसत आहेत. फोटोशूटमध्ये विकी खूप हॉट दिसत आहे. विकीने फोटो शेअर करून ‘वोगमध्ये भिजलेला.’ असे कॅप्शन दिले आहे,

View this post on Instagram

Stare case…

A post shared by Vicky Kaushal (@vickykaushal09) on


विकीच्या पोस्टवर त्याचा छोटा भाऊ आणि ‘गोल्ड’ चित्रपट फेम सनी कौशलने कमेंट करत ‘मित्रा…आरामाने आजारी पडशील, असे म्हटले आहे. तसेच ‘मसान’ चित्रपटात असलेली त्याची कोस्टार ऋचा चढ्डाने कमेंट मध्ये लिहिले आहे, मला तू विसरलास वाटते, तुझे शर्ट ट्रान्सपरंट आहे.


सध्या एकाचवेळी पाच चित्रपटांमध्ये विकी व्यस्त आहे. चित्रपट ‘भूत : द हॉन्टेड शिप’ पार्ट वनचे शूटिंग करत आहे. हा चित्रपट याचवर्षी 15 नोव्हेंबरला रिलीज होईल. यासोबतच शूजीत सरकार दिग्दर्शित ‘उधम सिंह’ च्या बायोपिकमध्ये तो दिसणार आहे. हा पुढच्यावर्षी गांधी जयंतीला रिलीज होईल.


या दोन चित्रपटांनंतर करण जोहरच्या ‘तख्त’ च्या शूटिंगमध्ये व्यस्त होणार आहे. यामध्ये तो मुघल बादशाह औरंगजेबचा रोल करणार आहे. तसेच मेघना गुलजार फील्ड मार्शल सॅम मानेकशॉ यांच्यावर आधारित चित्रपट बनवत आहे. यामध्ये विकी, मार्शल यांच्या भूमिकेत दिसणार आहे.

Leave a Comment