जगातील सर्वात मोठ्या रिंग मास्टरचा वाघांच्या हल्ल्यात मृत्यु


रोम : वाघांनी केलेल्या हल्ल्यात इटलीचे सर्वात मोठे सर्कस सरको ओरफीमध्ये जगातील सर्वात मोठे रिंग मास्टर एटोर वेबर यांचा मृत्यू झाला आहे. याबाबत स्थानिक मीडियाने दिलेल्या वृत्तानुसार, चार वाघ रिंगमध्ये होते, 61 वर्षीय एटोर वेबर आपल्या पुढच्या शोची तयारी करत आहे. तेव्हाच एका वाघाने त्यांना खाली पडले, यानंतर तीन वाघांनी देखील त्यांच्यावर हल्ला केला आणि त्यांचा मृत्यू झाला.

वाघांनी म्रुत्युनंतरही वेबर यांना सोडले नाही आणि त्यांच्या शरीराशी तब्बल अर्धा तास खेळत होते. ही घटना रिंगच्या बाहेर असलेल्या डॉक्टरांसमोर झाली. घटनेदरम्यान वेबर यांच्या साथीदाराने त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांना यश आले नाही. सध्या इटॅलियन पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरु केला आहे.

Leave a Comment