असे वाचवा तुमच्या स्मार्ट टीव्हीला हॅक होण्यापासून


स्मार्टफोन हँकिंग सध्या साधी गोष्ट झाली आहे. मात्र सध्या’ स्मार्ट टिव्ही’ देखील हँक होत आहेत. भारतात स्मार्ट टिव्ही वापरण्याचा ट्रेंड वाढला आहे. ट्रेडिशनल टिव्ही पेक्षा लोक स्मार्ट टिव्हीकडे वळत आहेत. स्मार्ट टिव्ही देखील काही प्रमाणात त्याच सॉफ्टवेअरचा वापर करून बनवण्यात येतो ज्याचा वापर स्मार्ट फोनसाठी केला जातो. स्मार्ट टिव्हीसाठी इंटरनेटची देखील आवश्यकता असते. त्यामुळे स्मार्ट टिव्ही हँक करणे सोपे झाले असून, हँकर आता टिव्हीला निशाणा बनवत आहेत.

सॅमसंग टिव्ही मार्केटमध्ये सर्वात आघाडीवर आहे. काही दिवसांपुर्वीच कंपनीने अधिकृत वेबसाईटवर हँकिंगपासून वाचण्यासाठी काही उपाय सांगितले आहेत. आता बाजारात असे स्मार्ट टिव्ही मिळणार आहेत, ज्यात आधीपासूनच मायक्रोफोन असणार आहे. मायक्रोफोनमुळे आवाजाद्वारे टिव्ही वापरता येऊ शकतो. सध्या रिमोटला वॉइस कमांड देऊन टिव्ही चालतो, असे टिव्ही ट्रेंडिंगमध्ये आहेत.

काही स्मार्ट टिव्ही असे देखील आहेत, ज्यात वॉइस कमांड कायमस्वरुपी सुरू असतात. त्यामुळे हँकर्स टिव्हीद्वारे सहजपणे तुमचे बोलणे ऐकू शकतो. स्मार्ट टिव्हीसाठी स्पेशल अ‍ॅप स्टोर देखील आहे, ज्याद्वारे टिव्हीसाठी वेगवेगळे अ‍ॅप डाऊनलोड करता येतात.

मार्केटमध्ये असे टिव्ही देखील आहेत, ज्यात कॅमेरे लावलेले आहेत. विचार करा की, जर हॅकर्सने स्मार्ट टिव्ही हॅक करून कॅमेरा आणि मायक्रोफोन कंट्रोल केला आहे. बेडरूममध्ये तुमच्या समोर टिव्ही आहे आणि तुम्हाला माहिती देखील नाही की, तुम्हाला कोणीतरी बघत आहे. तुमचे बोलणे ऐकत आहे. ज्याप्रमाणे मालवेअर असलेल्या अ‍ॅपद्वारे फोन हॅक केला जातो. त्याचप्रमाणे मालवेअर असलेले अ‍ॅप डाऊनलोड केल्याने स्मार्ट टिव्ही देखील हॅक केला जाऊ शकतो. कंपन्या स्मार्ट टिव्हीद्वारे वॉच हिस्ट्रीला समजते व त्याद्वारेच जाहिराती दाखवत असते.

स्मार्ट टिव्ही हँक होण्यापासून वाचण्यासाठी हे उपाय करा –
-जर तुमच्या स्मार्ट टिव्हीमध्ये कॅमेरा असेल, तर सेटिंग्जमध्ये जाऊन त्याला डिसेबल करा अथवा त्याच्यावर काळा टेप लावून त्याला झाकून टाका.
-सेटिंग्जमध्ये जाऊन मायक्रोफोनचा नेहमीच सुरू असणारा पर्याय बंद करा.
-कंपनीद्वारे येणाऱ्या अपडेटकडे दुर्लक्ष न करता वेळीच अपडेट करा.
-स्मार्ट टिव्हीमध्ये कोणतेही अ‍ॅप इन्स्टॉल करू नका.
-सॅमसंगच्या स्मार्ट टिव्हीच्या सेटिंगजमध्ये जाऊन अक्सेसिबिलिटी सेक्शनमध्ये जाऊन स्मार्ट सिक्युरिटी पर्याय सुरू करा.
-थर्ड पार्टी रिमोट अ‍ॅपचा वापर करू नये. कंपनीने दिलेला रिमोटच वापरावा.
-स्मार्ट टिव्हीला कोणत्याही वाय-फायशी कनेक्ट करू नये. सिक्युर नेटवर्कशीच कनेक्ट करावे.
-जर ट्रेडिशनल टिव्ही वापरून तुम्ही खुष असाल तर स्मार्ट टिव्ही घेणे टाळू शकतो.

Leave a Comment