चोरी गेलेला फोन शोधण्यासाठी सरकार घेऊन येत आहे नवीन टेक्नोलॉजी


मोबाईल फोन चोरीला जाणे ही मोठी समस्या आहे. स्मार्टफोन्समध्ये मोठ्या प्रमाणात आपला डाटा असतो. चोरी गेलेल्या फोनमधील डाटा आपण काही पर्याय वापरून डिलीट करू शकतो अथवा फोन परत मिळवण्याचा तरी प्रयत्न करतो. फोन चोरीला गेला तर एफआयर देखील नोंदवू शकतो. मात्र बऱ्याच वेळा चोरीला गेलेला फोन मिळतच नाही.

मात्र आता चोरी गेलेला फोन ट्रॅक करण्यासाठी सरकार लवकरच नवीन टेक्नोलॉजी आणणार आहे. हे ट्रॅकिंग आयएमईआय (IMEI) नंबरवर आधारीत असणार आहे. यामुळे जरी चोरी गेलेल्या फोनधील सिमकार्ड काढले तरी देखील फोन ट्रॅक करता येणार आहे. तसेच त्याची सर्विस देखील बंद करता येईल.

सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ टेलीमॅटिक्सला ही टेक्नोलॉजी तयारी करण्याची जबाबदारी देण्यात आलेली आहे. रिपोर्टनुसार, ऑगस्टमध्ये ही टेक्नोलॉजी लॉच केली जाऊ शकते. सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ टेलीमॅटिक्सलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, अधिवेशनानंतर टेलीकॉम विभागाच्या मंत्र्यांशी बोलून, पुढील महिन्यात ही टेक्नोलॉजी लाँच करण्यात येईल.

या प्रोजेक्टला को सेंट्रल इक्विप्मेंट आयडेंटिटी रजिस्टर (CEIR) असे म्हणण्यात येत आहे. यावर जुलै 2017 पासून काम सुरू आहे.
CEIR च्या सेटअपसाठी सरकारने 15 कोटी रुपयांचा निधी देण्याचा प्रस्ताव दिला असून, ज्यामुळे मोबाईल फोन चोरीवर लगाम आणण्यात येईल.या सिस्टीमच्या मदतीने चोरी करण्यात आलेल्या फोनची सर्विस बंद करता येईल. तसेच मोबाईलमधील सिमकार्ड दुसऱ्या फोनमध्ये टाकले तरी देखील ही टेक्नोलॉजी काम करेल.

मोबाईल फोन ट्रकिंगच्या या सिस्टिमुळे सरकारी संस्था देखील कायदेशीर अडथळा आणू शकतात. म्हणजे ग्राहकाच्या हितासाठी फोनची तपासणी देखील केली जाऊ शकते. हा प्रोजेक्ट महाराष्ट्रामध्ये झालेला आहे.ही टेक्नोलॉजी मोबाईल ऑपरेटर्सच्या सर्व आयएमईआय डेटाबेसची कनेक्ट असेल. यामुळे मोबाईल ऑपरेटर्स ब्लॅकलिस्टेड आयएमईआय असणारे फोन बंद करू शकतात. जेणेकरून ते कोणत्याही नेटवर्कशी काम करू शकणार आहे.

Leave a Comment