महापालिकेवर टीका करुन फसला अक्षय कुमार


बृहन्मुंबई महानगरपालिका ट्विटरवर आल्याबद्दल स्वागत करीत याचा लाभ नागरिकांना घेण्याचे आवाहन अभिनेता अक्षय कुमारने केल्यानंतर तो पुन्हा एकदा ट्रोल झाला आहे. त्यानंतर नेटकऱ्यांनी त्याच्या कॅनडा नागरिकत्वावरुन त्यावर टीका करायला सुरुवात केली आहे.


अक्षयने २९ एप्रिलला झालेल्या लोकसभा मतदानाच्यावेळी मुंबईत मतदान केले नव्हते. तो कॅनडाचा नागरिक असल्याची चर्चा त्यावेळी रंगली होती. भारताचे नागरिकत्व सतत देशप्रेमाच्या गोष्टी बोलणाऱ्या अक्षयकडे नसल्यावरुन टीका झाली होती. आपल्याकडे कॅनडाचा पासपोर्ट असल्याचे त्यानेही लपवले नव्हते.


बृह्नमुंबई महानगरपालिका ट्विटरवर आल्याचे स्वागत करताना अक्षयने लिहिले आहे, आता बृह्नमुंबई महानगरपालिका ट्विटरवर आली असून तुम्ही आपल्या सुचना किंवा तक्रारी बीएमसीला थेट कळवू शकता आणि त्याचे उत्तर मिळवू शकता. आपला आवाज थेट पोहोचवण्यासाठी याचा उपयोग करा.


मात्र अक्षय यानंतर ट्रोल झाला. त्याला अनेकांनी धारेवर धरत टीका केली. एका युजरने लिहिले आहे की, देशाचे मीठ टूथपेस्टमध्ये आहे, देशाची सुरक्षा हँडवॉशमध्ये आहे, देशभक्तीची झलक साबणात आहे…परंतु, देशाचे नागरिकत्व पासपोर्टवर नाही, हे कसले देशप्रेम आहे. त्याच्यावर अनेक प्रकारचे मीम्स तयार करण्यात आले आहेत. अनेक ट्विटमध्ये त्याला कमी लेखण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. तर अनेक चाहते अक्षयच्या समर्थनार्थही उतरले आहेत.

Leave a Comment