कपिल शर्माच्या शोमध्ये येण्यास या 4 सेलिब्रिटींचा सपेशल नकार


अनेक सेलिब्रिटी कॉमेडी किंग कपिल शर्माच्या शोमध्ये जाण्यासाठी आतूर असतात. पण असेही काही सेलिब्रिटी यात आहेत ज्यांनी एकदा नव्हे तर अनेकदा या शोमध्ये जाण्यास नकार दिला आहे. यातील चार सेलिब्रिटींबद्दल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

कपिल शर्माने महेंद्रसिंग धोनीचा बायोपिक ‘धोनी द अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी धोनीला शोमध्ये येण्यासाठी विचारण्यात आले होते. पण धोनीने आपण व्यस्त असल्याचे सांगत शोमध्ये येण्यास नकार दिला.

या शोमध्ये बॉलिवूडमधील तीनही खानांपैकी सलमान आणि शाहरुख अनेकदा येऊन गेले आहेत. पण या शोमध्ये आमिर खान एकदाही आला नाही. कोणत्याच शोमध्ये जाऊन आमिर चित्रपटाचे प्रमोशन करत नाही.

सचिन तेंडुलकरचा स्वतः कपिल शर्मा हा फार मोठा चाहता आहे. सचिनलाही त्याच्या शोमध्ये येण्यासाठी कपिलने आमंत्रित केले होते. पण शोमध्ये येण्यास सचिन तेंडुलकरने नकार दिला. आतापर्यंत विराट कोहलीपासून अनेक दिग्गज क्रिकेटर या शोमध्ये येऊन गेले आहेत.

कपिल शर्माच्या शोमध्ये बॉलिवूडमधील सुपरस्टार सेलिब्रिटी गेले आहेत. पण अजूनपर्यंत एकदाही संजय त्याच्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी या शोमध्ये गेलेला नाही.

Leave a Comment