भारताच्या मदतीने श्रीलंकेत युद्धग्रस्तांसाठी मॉडेल गाव तयार


श्रीलंकेत युद्धामुळे प्रभावित झालेल्या क्षेत्रातील नागरिकांसाठी राबविल्या गेलेल्या आवास योजनेतील पहिले मॉडेल गाव तयार झाले असून त्याचे उद्घाटन शनिवारी करण्यात आले. भारताने यासाठी १२०० कोटी रुपयांचे सहाय्य श्रीलंकेला दिले असून तयार झालेल्या पहिल्या मॉडेल व्हिलेज मध्ये २४०० कुटुंबाना घराचा ताबा दिला गेला आहे. भारतीय दुतावासाने त्यासंदर्भातील फोटो ट्विटरवर शेअर केले आहेत.

यावेळी श्रीलंकेचे मंत्री सजित प्रेमदासा, माजी राष्ट्रपती चंद्रिका भंडारनायके कुमारतुंगा व कार्यवाह हाय कमिशनर डॉ. शिल्पक अंबुले उपस्थित होते. हे पहिले गाव गम्पाहा येथे वसविले गेले आहे. अशी एकूण १०० गावे श्रीलंकेत उभारली जाणार आहेत. भारत सरकारने नागरिक कल्याण योजनेअंतर्गत श्रीलंकेत विविध क्षेत्रात ७० प्रकल्प हाती घेतले आहेत. त्यात आरोग्य, शिक्षण, घरबांधणी, कौशल्य विकास, पायाभूत सुविधा, व्होकेशनल ट्रेनिंग यांचा समावेश आहेत. यातील २० प्रकल्प सुरु झाले आहेत.

उत्तर आणि पूर्व श्रीलंकेत युद्धग्रस्त नागरिक तसेच इस्टेट कामगार यांच्यासाठी ६० हजार घरे उभारली जात असून मॉडेल गाव अंतर्गत ही घरे बांधली जात आहेत.

Leave a Comment