क्रिकेट सट्टा उलाढाल पोहोचली ३ लाख कोटींवर


वर्ल्ड कपचा थरार अंतिम टप्प्यात येऊन पोहोचला असताना मुंबई पोलिसांनी पंचतारांकित हॉटेलवर छापा टाकून सट्टा रॅकेट उघडकीस आणले आणि काही जणांना अटक केली. यामुळे पुन्हा एकदा क्रिकेट सट्टा किंवा बेटिंगवर जोरदार चर्चा सुरु झाली आहे. गेली अनेक वर्षे ऑफलाईन बरोबर ऑनलाईन सट्टेबाजी मोठ्या प्रमाणावर केली जात आहे. भारतात बेटिंग वर बंदी आहे तरीही प्रचंड संख्येने लोक सट्टा लावत असल्याचे उघड झाले आहे. फेडरेशन ऑफ इंडिअन कॉमर्स आणि इंडस्ट्रीच्या रिपोर्ट नुसार या बेटिंग मधली उलाढाल ३ लाख कोटींवर पोहोचली आहे. म्हणजेच ती भारताच्या रक्षा बजेट इतकी झाली आहे.

कमिटी सदस्य आणि सुगल दमाणी चे सीइओ कमलेश यांनी लॉ कमिशनच्या रिपोर्टचा हवाला देऊन दिलेल्या माहितीनुसार बेटिंग वर पूर्णपणे बंदी हवी अन्यथा ते कायदेशीर केले जावे. कायद्याने बेटिंगला मान्यता दिली तर त्यातून सरकारला दरवर्षी १२ ते १९ हजार कोटींचा महसूल मिळेल शिवाय त्यामुळे रोजगार निर्माण होईल. तसेच कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी येणाऱ्या अडचणी कमी होतील.


सध्या वर्ल्ड कप खेळत असलेल्या १० पैकी सहा देशात क्रिकेट बेटिंगला कायद्याची मान्यता आहे. न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, वेस्ट इंडीज, द. आफ्रिका आणि इंग्लंड मध्ये क्रिकेट बेटिंग कायद्याने वैध आहे. विशेष म्हणजे क्रिकेट बेटिंग मध्ये ६५ टक्के बेटिंग टीम इंडियाच्या सामन्यांवर होते मात्र तरीही भारतात बेटिंगला कायद्याची मान्यता नाही.

काही जाणकारांच्या मते भारतात बेटिंगला कायदेशीर मान्यता नसल्याने अनेक स्पोर्ट्सची प्रतिमा खराब होते आहे. आता तर अॅपस आणि वेबसाईटवरून क्रिकेट बेटिंग केले जाते इतकेच नव्हे तर बेटिंग कसे करावे. सट्टा कसा लावला याचे प्रशिक्षण सुद्धा ऑनलाईन दिले जाते. या अॅप किंवा वेबसाईट परदेशातून संचालित केल्या जातात त्यामुळे पोलीस कारवाई वर मर्यादा येतात. लिंकच्या माध्यमातून बेटिंग करणारे एकमेकांशी संपर्कात असतात.

WWW.ONLINECRIKET BETTING.NET, वेबसाईटवर सट्टा कसा लावावा याचे मार्गदर्शन केले जाते तर बेटवे, बॅटरली इंडिया, स्पिन पॅलेस, दफाबेट या साईटवरून सट्टा खेळला जातो. त्यासाठी पैसे डेबिट, क्रेडीट कार्डवरून घेतले जातात. त्यासाठी एजंटला पैसे देऊन खाते उघडले जाते. सट्टा लावणाऱ्याला लाईन म्हटले जाते. हाच पंटरच्या माध्यमातून बुकीशी संपर्क करतो. सामन्याच्या पहिला चेंडू पासुन शेवटचा चेंडू पर्यंत बेटिंग केले जाते. या काळात टीमचे भाव खालीवर होत राहतात. वापरली जाणारी भाषा कोड भाषा असते असे सांगतात.

Leave a Comment