युएई देणार पर्यटकांना मोफत सिमकार्ड


संयुक्त अरब अमीरातने देशात येणाऱ्या पर्यटकांसाठी खास घोषणा केली आहे. देशात येणाऱ्या सर्व पर्यटकांना संयुक्त अरब अमीरात मोफतमध्ये सिमकार्ड देणार आहे. या सिमकार्डमध्ये मोफत 20 एमबी डाटा, आतंरराष्ट्रीय कॉल आणि मेसेजची देखील सुविधा असणार आहे. जर एखाद्या पर्यटकाने व्हिजाची मुदत वाढवली तर सिमकार्डची मुदत देखील आपोआपच वाढेल.

युएईच्या ओळख आणि नागरिकता प्राधिकरणाने ही घोषणा केली असून, प्राधिकरणाने देशात पर्यंटकांना मोफत सिमकार्ड देण्यासाठी काही दिवसांपुर्वीच दुरसंचार कंपनी टेलीकॉम नाऊ बरोबर करार केला आहे.

टेलीकॉम नाऊचे चेअरमन आणि सीईओ कारबेल फवाज लितानी यांनी सांगितले की, ‘युएईमध्ये पोहचल्यावर पर्यटकांना पासपोर्ट कंट्रोल अधिकाऱ्यांकडून भेट म्हणून सिमकार्ड देण्यात येईल.’

मागील वर्षी 20 लाखांपेक्षा अधिक भारतीय नागरिकांनी दुबईला भेट दिली होती. दुबई हे युएईचे सर्वात मोठे शहर आहे. त्यामुळे आता युएईला भेट देणाऱ्या भारतीय नागरिकांना मोफत सिमकार्ड मिळणार आहे.

Leave a Comment