या बॉलिवूड अभिनेत्रींच्या वयापेक्षा खूप लहान आहेत त्यांचे जोडीदार


1981 मध्ये प्रदर्शित झालेला प्रेम गीत चित्रपटातील गाणे ‘न उम्र की सीमा हो न जन्म का हो बंधन’ बॉलिवूडमधील कलाकारांसाठी एकदम फीट बसते. सध्ये फिल्म इंडस्ट्रीमध्ये मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांच्या अफेअरच्या जोरदार चर्चा सुरू आहेत. मात्र याही पेक्षा जास्त चर्चा त्या दोघांच्या वयामध्ये असणाऱ्या अंतराची होत आहे. त्या दोघांच्याही वयामध्ये 14 वर्षांचा फरक आहे. त्यामुळे त्या दोघांना सोशल मीडियावर जोरदार ट्रोल्स केले जाते.

एका मुलाखती दरम्यान मलायका अरोरा म्हणाली होती की, ‘आपण अशा समाजात राहतो जेथे एका वयस्कर पुरूषाने आपल्या पेक्षा लहान मुलीवर प्रेम केले तर आपण ते स्विकार करतो. मात्र त्याच पुरूषाच्या जागेवर जर स्त्री असेल तर मात्र आपण ते स्विकार करत नाही.’

अर्जुन आणि मलायका यांच्या व्यतरिक्त बॉलिवूडमध्ये अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी आपल्या पेक्षा कमी वयाच्या व्यक्तीला जोडीदार बनवले आहे.

अभिनेत्री उर्मिला मातोंडकर गेली अनेक वर्षांपासून चित्रपट सृष्टीमध्ये आहे. काही दिवसांपुर्वीच तिने लोकसभा निवडणूक लढवली होती व त्यात तिला पराभवाचा सामना करावा लागला होता. उर्मिलाने मीर मोहसिन अख्तर यांच्याबरोबर लग्न केले असून, उर्मिला मोहसिन पेक्षा 9 वर्षांनी मोठी आहे.

फराह खान बॉलीवूडमधील एक प्रसिध्द डायरेक्टर आणि कोरियोग्राफर आहे. फराह खानची पती शिरीष कुंदर यांची पहिली भेट मैं हू ना च्या सेटवर झाल्याचे सांगितले जाते. दोघांनी 2004 साली लग्न केले. फराह खान या शिरीष पेक्षा 9 वर्षांनी मोठ्या आहेत.

अभिनेत्री प्रिती झिंटा शेवटच्या सनी देओलच्या भइया जी सुपरहीट या चित्रपटात दिसली होती. प्रिता झिंटाने देखील 2016 मध्ये आपल्या पेक्षा 10 वर्ष लहान जीन गुडइनफबरोबर लग्न केले आहे.

सध्या सुष्मिता सेन आणि रोहमन शॉल हे रिलेशनमध्ये असल्याच्या जोरदार चर्चा सुरू आहेत. दोघांना अनेकवेळा सोबत पाहिले जाते. काही दिवसांपुर्वीच सुष्मिताच्या भावाच्या लग्नात रोहमन देखील उपस्थित होता. सुष्मिता रोहमन पेक्षा 15 वर्षांनी मोठी आहे.

प्रियंका चोप्राने मागीलवर्षी ख्रिश्चन आणि हिंदू पध्दतीने हॉलिवूड अभिनेता आणि गायक निक जोनस बरोबर लग्न केले. दोघांच्या वयात देखील मोठे अंतर आहे. प्रियंका निक पेक्षा 10 वर्षांनी मोठी आहे.

Leave a Comment