कोंबड्याचे आरवणे फ्रांसमध्ये बनला आहे राष्ट्रीय मुद्दा


फ्रांसचे ओलरिन द्विप हे सध्या एका कोंबड्यामुळे चर्चेचा विषय ठरले आहे. कोंबडे आरवल्यामुळे सुरू झालेली न्यायालयीन लढाई ही आता फ्रांसमध्ये राष्ट्रीय सन्मानाची गोष्ट झाली आहे.

एका महिलेने मॉरिस नावाचा कोंबडा पाळला आहे. मॉरिस नावाच्या या कोंबड्याच्या सकाळच्या आरवल्याने त्रास होत असल्याने एक वयस्कर दांपत्यानी थेट न्यायालयातच धाव घेतली आहे. त्यांचा आरोप आहे की, रोज सकाळी कोंबड्याच्या आरवल्याने झोप मोड होत असते. त्यामुळे या कोंबड्यामुळे दुसऱ्यांना देखील त्रास होतो. मात्र कोंबड्याच्या मालकीणीचे म्हणणे आहे की, त्या सेंट पियरे डी ऑलेरॉन शहरात राहतात, येथे ही कोंबड्याचे आरवणे सामान्य गोष्ट आहे.

सध्या फ्रांसमध्ये हे प्रकरण राष्ट्रीय स्वाभिमानाशी जोडले गेले आहे. कोंबडा फ्रांसच्या राष्ट्रीय चिन्हांपैकी एक आहे. त्यामुळे अनेक लोक त्या कोंबड्याच्या मालकीण कॉरिन फेसेउ यांना पाठिंबा देत आहे. मालकीणीचे म्हणणे आहे की, ती कोंबड्याला शेडमध्ये बंदकरून लाईटबंद करते जेणेकरून, कोंबडा आरवणार नाही.

भारतात देखील याआधी कोंबडा आरवल्याने त्रास होत असल्याच्या कारणाने तक्रारी करण्यात आलेल्या आहेत. काही महिन्यांपुर्वीच चंदीगढ सेक्टर 47 मधील एका रिटायर्ड मेजरने कोंबडा आरवल्याने सकाळची झोप मोड होत असल्याचे सांगत शेजाऱ्यांविरोधात तक्रार दाखल केली होती.

पुण्यात देखील काही दिवसांपुर्वी एका महिलेने हेच कारण सांगत पोलिसात तक्रार दाखल केली होती. मध्यप्रदेशच्या शिवपुरीमध्ये देखील अशीच एक घटना समोर आली होती.

Leave a Comment