हा आहे पृथ्वीवरील नरकाचा दरवाजा, 47 वर्षांपासून लागली आहे आग


सर्वसामान्य माणूस नेहमीच स्वर्गाच्या कल्पना करत असतो. स्वर्ग किती सुंदर असेल याची कल्पना करतो. सोनेरी गेटमधून आपला प्रवेश झाल्यावर आपलं स्वागत केलं जाईल असा विचार आपण करतो. मात्र जेव्हा आपण नरकाबद्दल विचार करतो तेव्हा एखादी अंधेरी गुहा, जेथे आग निघते आहे असे चित्र डोळ्यासमोर उभे राहते. मात्र जर खरचं नरक आपल्याला दिसले तर?

सोशल मीडियावर मागील अनेक दिवसांपासून, ‘डोर टू हेल’चे फोटो व्हायरल होत आहे. हे फोटो तुर्कमेनिस्तानचे आहेत. जेथे एका खड्ड्यात मोठ्या प्रमाणात आग लागली आहे. तुर्कमेनिस्तानची राजधानी अश्गाबातपासून 260 किलोमीटर दूर काराकुम वाळवंटातील दरवेज गावातील या खड्ड्यात 47 वर्षांपासून आग लागलेली आहे.

या जागेला जगातील सर्वात मोठे नैसर्गिक गॅसचे ठिकाण समजले जाते. 1971 मध्ये सोव्हियत संघाच्या वैज्ञानिकांनी मिथेन गॅस जमा करण्यासाठी या ठिकाणी ड्रिलिंग केले होते. एके दिवशी येथे स्फोट झाला. त्यानंतर ‘नरकाचा दरवाजा’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या या जागेवर आग लागलेली आहे.

वैज्ञानिकांनी मिथेन गॅस पसरू नये यासाठी या खड्ड्यात आग लावली. त्यांना वाटले होते की, आग एक-दोन आठवड्यात थांबेल. मात्र ही आग आजही सुरूच आहे. ज्या खड्ड्यात ही आग लागलेली आहे तो घड्डा 229 फूट रूंद आणि 65 फूट खोल आहे. पर्यटकांसाठी ही जागा आकर्षणाचे केंद्र बनले आहे. अनेक ठिकाणाहून या ‘नरकाच्या दरवाजा’ला बघण्यासाठी लोक गर्दी करतात व या खड्ड्यासोबत फोटो देखील काढतात.

Leave a Comment