बिटकॉइन खननामध्ये खर्च होत आहे सर्वात जास्त वीज


जर तुम्हाला वाटत असेल की, मोठ्या मोठ्या कंपन्यांमध्ये विजेचा वापर सर्वात जास्त होत असतो, तर तुम्ही चुकीचे आहात. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, डिजिटल चलन बिटकॉइन खननामध्ये सर्वात जास्त विजेचा वापर होत आहे. केंब्रिज युनिवर्सिटीच्या एका अहवालानुसार, प्रत्येक वर्षी बिटकॉइन खननामध्ये जवळपास टेरावाट विज खर्च होत आहे. सध्या बिटकॉइन ही जगातील सर्वात महाग क्रिप्टोकरेंन्सी आहे. सध्या एका बिटकॉइनची किंमत 7.83 लाख रूपये एवढी आहे.

कोणत्याही सामान्य माणसाला समजणे अवघड आहे की, बिटकॉइन खननामध्ये विजेचा वापर काय आहे. मात्र बिटकॉइनचे खनन करण्यासाठी जगभरातील कॉम्प्युटर वापरले जात असून, यामुळेच विज खर्च होत आहे. महागडी क्रिप्टोकरेंन्सी असल्याने देण्या-घेण्यामध्ये मोठ्या प्रमाणात सावधानता बाळगावी लागत असते. बिटकॉइन खननासाठी एका मोठ्या कॉम्प्युटर प्रणालीचा उपयोग केला जातो. या खननामध्ये सर्वसामान्य लोकांनाच सहभागी केले जाते व त्यांना त्याबदल्यात बिटकॉइन देण्यात येते. या बिटकॉइन खननासाठी कामगार दररोज 12 तास कॉम्प्युटरचा वापर करत असतात त्यामुळेचे विजेचा मोठ्या प्रमाणात वापर होतो.

केंब्रिज युनिवर्सिटीने याची माहिती घेण्यासाठी एका टूलचा वापर केला. अंदाजानुसार बिटकॉइन खननामध्ये वापरली जाणारी विज स्विर्झलँडच्या एकावर्षाच्या वापरा एवढी आहे.

इराणने काही दिवसांपुर्वीच बिटकॉइन खननासाठी वापरण्यात येणारे कॉम्प्युटर बंद केले होते. तसेच एका रिपोर्टनुसार जर बिटकॉइन जागतिक मुद्रा झाली तर पुढील 25 वर्षात तापमान हे 2 डिग्री सेल्सियम पर्यंत वाढू शकते. भारतात सध्या क्रिप्टोकरेंन्सीवर बंदी आहे. मात्र भारत सरकार लवकरच ही बंदी हटवू शकते.

Leave a Comment