3 लाखांच्या गाडीसाठी नंबर खरेदी केला 6 लाखांचा


गाड्यांच्या वीआयपी नंबरसाठी मोठी किंमत लावणे ही सध्या साधी गोष्ट झाली आहे. मात्र जयपूरमधील एका व्यक्तीने 3 लाखांच्या कारसाठी तब्बल 6 लाखांचा नंबर खरेदी केला आहे. 0001 हा वीआयपी नंबर त्या व्यक्तीने 5 लाख 21 रुपयांमध्ये खर्च केला व त्याचा संपुर्ण खर्च सहा लाख रुपये आहे.

प्रादेशिक परिवहन कार्यालयाने माहिती दिली की, बीएस-5 प्रकारातील चारचाकी वाहनांच्या नोंदणीसाठी 45 सीएमच्या 0001 नंबरसाठी लिलाव करण्यात आला. यासाठी चार लोकांनी अर्ज केले होते. यामध्ये मर्सिडिजपासून ते ऑल्टो सारख्या कारचा समावेश होता. ऑल्टोचे मालक संजयने 5.21 लाखांची सर्वाधिक बोली लावत नंबर विकत घेतला.

या ऑल्टोची किंमत 3 लाख आहे. मात्र नंबरसाठी बोली 5 लाख 21 हजार आणि अर्ज केलेला डीडी 1 लाख 1 हजार असे मिळून नंबर तब्बल 6 लाख 22 रुपयांमध्ये खरेदी करण्यात आला.

आरटीओ राजेंद्र वर्मा यांनी सांगितले की, पहिल्यांदाच मर्सिडिजसोडून हा नंबर ऑल्टोच्या मालकाकडे गेला आहे. बोली मर्सिडिच्या मालकांनी सुरू केली. वॅग्नार, क्रेटा आणि ऑल्टोचे मालक बोली लावत गेले. मात्र बोली दीड लाखांपेक्षा वर गेल्यावर मर्सिडिजच्या मालकांनी बोली सोडून दिली.

Leave a Comment