असे आहे सारा-कार्तिकच्या आगामी चित्रपटाचे नाव


दिग्दर्शक-निर्माता इम्तियाज अली लवकरच तुमच्या भेटीला एक चित्रपट घेऊन येत असून या चित्रपटात अभिनेता कार्तिक आर्यन आणि अभिनेत्री सारा अली खान ही जोडी पहिल्यांदाच एकत्र झळकणार आहे. चित्रपटाचे गेल्या अनेक दिवसांपासून सुरु असलेले शूटिंग पूर्ण करण्यात आले आहे. सुरुवातीला या चित्रपटाचे नाव गुलदस्त्यात ठेवण्यात आले होते. पण आता दिग्दर्शक इम्तियाज अली यांनी ‘लव आजकल’च्या सिक्वलच्या नावाची घोषणा केली आहे. सारा-कार्तिक गेल्या अनेक दिवसांपासून शूटिंग करत असलेल्या चित्रपटाचे ‘लव आजकल २’ असे नाव असल्याचा अंदाज लावला जात होता. पण या चित्रपटाला आता इम्तियाज अली यांनी ‘आजकल’ हे शिर्षक दिले आहे.


दरम्यान सारा-कार्तिक शूटिंगदरम्यानचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. आता सारा-कार्तिकचा एक फोटो शेअर करत, कॅप्शनमधून चित्रपटाच्या शिर्षकावर इम्तियाज अली यांनी शिक्कामोर्तब केला आहे. कार्तिक आर्यन आणि सारा अली खान यांचा आगामी चित्रपट ‘आजकल’ सैफ अली खान आणि दीपिका पादुकोण स्टारर ‘लव आजकल’चा सीक्वल आहे. सारा, कार्तिकशिवाय चित्रपटात रणदीप हुड्डादेखील भूमिका साकारणार आहे. ‘आजकल’ १४ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे.

Leave a Comment