भिकाऱ्यांच्या गराड्यात सापडली रकुलप्रीत


सध्याच्या घडीला सोशल मीडियावर एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून अभिनेत्री रकुलप्रीत सिंह ज्यामध्ये भिक मागणाऱ्या लहान मुलांच्या गराड्यात अडकल्यामुळे तिचा चांगलाच गोंधळ उडालेला दिसत आहे. लहान मुले व्हिडीओमध्ये रकुलप्रीतकडे जेवण आणि पैसे मागत आहेत.

रकुलप्रीत सिंह व्हिडीओमध्ये या लहान मुलांमध्ये फसलेली आहे. रकुलप्रीत सिंह यामधून निघण्यासाठी प्रयत्न करत आहे. पण लहान मुले जबरदस्ती तिला चिकटत असून पैशांची मागणी करत आहेत. रकुलप्रीतला अनेक प्रयत्न केल्यानंतर आपल्या गाडी जवळ पोहचता येते. गाडीत बसून रकुलप्रीत निघून जाते.

View this post on Instagram

The solid salad surprise 🙀 #rakulpreetsingh

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on


अनेकजण हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर यावर प्रतिक्रिया देत आहेत. पण यामध्ये अनेकजण अभिनेत्रीच्या बाजूने बोलत आहेत. बॉलिवूडमधील ‘दे दे प्यार दे’ चित्रपटात रकुलप्रीत सिंह नुकतीच दिसली. रकुल शिवाय या चित्रपटात अभिनेता अजय देवगन आणि अभिनेत्री तब्बू प्रमुख भूमिकेत होते. चित्रपटात रकुलप्रीत सिंहचा अभिनय आणि तिचा डान्सही सर्वांना आवडला.

Leave a Comment