आता 2023मध्ये पूर्ण होणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प


नवी दिल्ली – शुक्रवारी सादर करण्यात आलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनची डेडलाईन वाढविण्यात आल्यामुळे 2022 साली पूर्ण करण्यात येणारा हा प्रकल्प 2023 ला पूर्ण करण्यात येईल, असे अर्थसंकल्पात नमूद करण्यात आले आहे.

मोदी सरकारचे भारताच्या सुवर्णमध्य वर्षांत 2022 साली बुलेट ट्रेन प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट होते. पण पालघर, ठाणे परिसरात जमीन या प्रकल्पासाठी अधिग्रहण करण्यासाठी विलंब होत आहे. तर नवी मुंबई येथील खारफुटीची झाडे वाचवण्यासाठी नवी मुंबईतील बुलेट ट्रेनच्या मार्गात बदल करण्यात येणार असल्याचे नुकतेच हा प्रकल्प राबवत असलेल्या हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडने जाहीर केले. बुलेट ट्रेनच्या प्रकल्पाला पूर्ण करण्याचे उद्दिष्ट यासह विविध कारणांमुळे एका वर्षाने वाढविण्यात आले आहे. मुंबई ते अहमदाबाद हे अंतर या बुलेट ट्रेन प्रकल्पामुळे अवघ्या दोन तासात पार पडेल. यामुळे प्रवासी वेळ वाचणार असून प्रवाशांचा प्रवास जलद होणार आहे. तसेच यामुळे दोन शहरांमधील प्रवासी अंतर कमी होण्यास मदत होईल.

Leave a Comment