नवी दिल्ली – राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा फोटो दारूच्या बाटलीवर लावल्याचा प्रकार समोर आला असून कंपनीने भारतीयांच्या रोषानंतर माफी मागितली आहे. दारूच्या बाटलीवर इस्त्राइलमधील ताफेन औद्योगिक क्षेत्रातील माका ब्रेवरी या कंपनीने चक्क महात्मा गांधींचा फोटो लावला होता.
इस्त्राइलमधील दारूच्या बाटलीवर चक्क महात्मा गांधींचा फोटो
या दारू उत्पादनाची निर्मिती इस्त्राईलच्या ७१ व्या स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आली होती. महात्मा गांधींचे छायाचित्र त्यामधील काही बाटल्यावर लावण्यात आले. नेटकऱ्यांनी सोशल मीडियावरून यावर तीव्र नाराजी व्यक्त केल्यानंतर यासर्व प्रकाराबाबत इस्त्राइल कंपनीने भारतीयांची भावना दुखावल्या बाबत माफी मागितली आहे. त्याचबरोबर तर महात्मा गांधी यांचा आम्हीही सन्मान करतो, महात्मा गांधी यांचे चित्र बाटल्यांवर लावल्याबद्दल आम्ही माफी मागत असल्याचेही कंपनीने म्हटले आहे.
#Gandhi ji's caricature pic wearing shades on a liquor bottle made by a Israel-based Maika Breweries stokes mega row. #MahatmaGandhi Research Foundation writes to @IsraeliPM registering strong protest @IndiaAheadNews @PMOIndia pic.twitter.com/Z9xY7g4WQ9
— Sourav Sanyal (@SSanyal) July 1, 2019
महात्मा गांधींचा फोटो दारूच्या बाटलीवर आढळल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता. भारत सरकार आणि परराष्ट्र मंत्रालयाने यावर आक्षेप घेतला होता. राज्यसभेच्या अनेक सदस्यांनी या घटनेची माहिती मिळताच नवी दिल्लीत निषेध केला होता. त्याचबरोबर या संदर्भात कारवाई करण्याची मागणीही केली होती.
दरम्यान, केरळच्या महात्मा गांधी नॅशनल फाउंडेशनचे चेअरमॅन एबी जे जोसने यांनी या प्रकरणावर पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे तक्रार केली आहे. रविवारी इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनाही जोस यांनी पत्र लिहीले. त्यांनी दारू कंपनी आणि त्याच्या मालकाविरूद्ध कारवाई करण्याची मागणी केली आहे.