बजेटच्या दुसऱ्या दिवशीच कडाडले पेट्रोल-डिझेलचे दर


नवी दिल्ली – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी कालच अर्थसंकल्प सादर केल्यानंतर आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. पेट्रोल 2.45 पैशांनी तर डिझेल 2.36 पैशांनी महागले आहे. सर्वसामान्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरांमुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

पेट्रोलचे दर 2.45 पैशांनी वाढून 72.96 वर पोहचले आहेत. तर डिझेलचा दर 2.36 पैशांनी वाढून 66.69 रुपये एवढे झाले आहेत. दररोज पेट्रोल आणि डिझेलचे दर नवा उच्चांक गाठत आहेत. सातत्याने इंधन दरवाढ कमी व्हावी, अशी मागणी होत असतानाच पेट्रोल आणि डिझेलच्या दरात रोज वाढ होताना दिसत आहे.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर करतानाच पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होणार असल्याचे सांगितले होते. तेलाचे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील दर पाहता पेट्रोल, डिझेलच्या किमती वाढणे अपरिहार्य असल्याचे वित्त मंत्रालयाच्या अधिकाऱ्याने सांगितले होते. पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढल्यामुळे नागरिकांच्या खिशाला मात्र झळ बसणार आहे.

Leave a Comment