आपल्या ट्विटर अंकाऊटवर तेलगु सुपरस्टार अलू अर्जुनने आपल्या नव्या कोऱ्या आलिशान व्हॅनिटी व्हॅनचा फोटो शेअर केला. त्याने यासोबत, मी आयुष्यात जेव्हाही काही नवीन खरेदी करतो तर माझ्या डोक्यात एकच गोष्ट असते की, लोक माझ्यावर खूप प्रेम करतात. ही त्यांच्याच प्रेमाची ताकत आहे की, मी व्हॅनिटी व्हॅन खरेदी केली. नेहमी आभारी आहे. सर्वांचे धन्यवाद. ही माझी व्हॅनिटी व्हॅन FOLCON, असे लिहिले आहे
तुम्ही पाहिली आहे का सुपरस्टार अलू अर्जुनची आलिशान व्हॅनिटी व्हॅन?
इतर माध्यमांमध्ये याबाबत आलेल्या वृत्तानुसार सुमारे 7 कोटी रुपये या व्हॅनिटी व्हॅनची किंमत आहे. रेड्डी कस्टम्सद्वारे याला स्पेशली मॉडिफाय केले गेले. यामध्ये आलिशान केविन सोबत अलू अर्जुनच्या नावाचा लोगो AA देखील लावला गेला आहे. मास्टर केविनमध्ये एक रिक्लायनर आहे, ज्याचा वापर अलू मीटिंग्ससोबत टीव्ही पाहण्यासाठीही करू शकतो. याव्यतिरिक्त आराम करण्यासाठी आणि फ्रेश होण्यासाठीदेखील आलिशान सुविधा व्हॅनमध्ये उपलब्ध आहेत. सांगितले जाते आहे की, रेड्डी कस्टम्सला याला तयार करायला सुमारे 5 महिन्यांचा वेळ लागला. केवळ याच्या इंटेरियरवर सुमारे 3.5 कोटी रुपये खर्च झाले आहेत.
केवळ दोन वर्षांचा होता तेव्हापासून अलू चित्रपटात काम करत आहे. 1985 मध्ये त्याचा पहिला तेलगु चित्रपट विजेता आला होता, तो ज्यामध्ये एक चाइल्ड आर्टिस्ट दाखवला गेला होता. पण, लीड अभिनेता म्हणून तो पहिल्यांदा गंगोत्री (2003) मध्ये दिसला होता. त्याने आतापर्यंत ‘आर्य’ (2004), ‘आर्य 2’ (2009), ‘येवडू’ (2014) आणि ‘ना पेरू सूर्या’, ‘ना इलू इंडिया’ (2018) यांसारख्या 20 पेक्षा जास्त चित्रपटात दिसला आहे. त्याचे तीन चित्रपट ‘एए19’, ‘एए20’ आणि ‘आयकॉन’ सध्या फ्लोअरवर आहे.