भारतीला वाढदिवसाच्या निमित्ताने नवऱ्याकडून महागडे गिफ्ट


छोट्या पडद्यावरील कॉमेडी क्वीन भारती सिंहने नुकताच आपला 33वा वाढदिवस साजरा केला. भारतीला पत्नी हर्ष लिम्बाचिया याने बर्थ डेचे गिफ्ट म्हणून एक महागडे घड्याळ गिफ्ट दिले. याची माहिती भारती सिंहने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करुन दिली.


घड्याळाचा फोटो शेअर करताना भारतीने त्याला एका कॅप्शन देखील दिले आहे. तिने हर्षचे या गिफ्टबाबत आभार मानले आहेत. तीन घड्याळे या फोटोमध्ये दिसत असून या संदर्भात टाईम्स नाऊने दिलेल्या वृत्तानुसार 12 ते 15 लाखपर्यंत या घड्याळ्यांची किंमत जवळपास असल्याचा अंदाज आहे. भारती सध्या ‘खतरा खतरा खतरा’ या कार्यक्रमामध्ये काम करत आहे. कॉमेडी शोच्या सेटवर भारती आणि हर्षची भेट पहिल्यांदा झाली होती. दोघांमध्ये या शोदरम्यान मैत्री झाली आणि त्यानंतर मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाल्यानंतर भारती आणि हर्ष ३ डिसेंबर, २०१७ साली लग्नाच्या बेडीत अडकले.

Leave a Comment