बंगळुरू – कर्नाटकातील काँग्रेस-जेडीएस सरकार अडचणीत सापडले असून आज पक्ष कार्यालयात सत्तारूढ पक्षाच्या अकरा आमदारांनी आपले राजीनामे दिल्याची माहिती सभापती रमेश कुमार यांनी दिली आहे. राज्यातील गठबंधन सरकार आमदारांनी राजीनामा दिल्याने निश्चितपणे पडणार असल्याची शक्यता आहे.
कर्नाटकमधील सत्ताधारी पक्षाच्या 11 आमदारांचे राजीनामे
सभापतींना बीसी पाटील ,एच विश्वनाथ, नारायन गौडा, शिवराम हेब्बार , महेश कुमाथ्थली, गोपाल , रमेश जार्खीहोली आणि प्रताप गौडा यांनी इतर तीन आमदारांनी आपले राजीनामे दिले आहेत. कर्नाटक विधानसभेची निवडणूक मागच्या वर्षी पार पडली होती. भाजपने या निवडणुकीत १०४ जागा मिळवल्या होत्या. पण भाजपला पूर्ण बहुमत सत्ता काबीज करता आली नव्हती. त्यानंतर काँग्रेस आणि जेडीएस यांनी एकत्र येत सरकार स्थापन केली. मुख्यमंत्रीपदावर जेडीएसचे कुमारस्वामी हे विराजमान झाले. पण सत्तेत सहभागी असलेल्या दोन पक्षांमधील 11 आमदारांनी राजीनामे दिल्यामुळे दोन्ही पक्षांच्या अडचणी वाढणार आहेत.