स्वास्थ्यासाठी हानिकारक होणार फाईव जी नेटवर्क?


जगभरात सर्वाधिक वेगवान नेटवर्क फाईव्ह जी प्रसारणाची तयारी जोरदार सुरु असून चीनच्या शांघाई नगरीत ही सेवा सुरु केली गेली आहे तर अनेक अन्य देशात अनेक मोबाईल कंपन्या या नेटवर्कच्या चाचण्या घेत आहेत. मात्र तंत्रज्ञान क्षेत्रातील जाणकार या नेटवर्कच्या वापराबाबत आणि त्यामुळे माणसाला भोगाव्या लागणाऱ्या दुष्परिणामाबाबत सावधगिरीचा इशारा देत आहेत. या नेटवर्कचा प्रचंड वेग आणि त्यामुळे होणारे रेडीएशन माणसाच्या स्वास्थ्यासाठी धोकादायक ठरू शकते. यामुळे टेलिकॉम नियामक मंडळाने या नेटवर्कच्या वापरासंदर्भात अगोदर काटेखोर नियमावली बनवावी आणि त्याचे पालन बंधनकारक करावे अशी मागणी केली जात आहे.

इंटरनेटच्या मागणीत प्रचंड वाढ झाल्याने ४ जी नेटवर्क ओव्हरलोडची शिकार बनले आहे आणि ५ जी नेटवर्क लवकरात लवकर कार्यान्वित करण्याची गरज निर्माण झाली आहे हे खरे असले तरी ४ जीच्या तुलनेत ५ जीचा वेग अफाट आहे. या रेडीओ फ्रिक्वेन्सी मुळे रेडीएशन अधिक प्रमाणात होणार आहे. ५ जी सुरु झाले कि मोबाईल टॉवरची संख्या वाढणार आहे आणि त्याचा वापर करताना सुरक्षा मानके पाळली गेली नाहीत तर त्याचे दुष्परिणाम मानव जातीला भोगावे लागणार आहेत असा इशारा तज्ञ देत आहेत.


५ जी साठी वापरल्या जाणाऱ्या रेडीओ फ्रिक्वेन्सीच्या संपर्कात दीर्घ काळ राहिल्यास ब्रेन कॅन्सर, डोळे, त्वचा यांना हानी, जीवजंतूविरोधातील प्रतिकारशक्ती कमी होणे, लहान मुलाना डोकेदुखी, नपुसंगत्व असे अनेक प्रकारचे धोके निर्माण होऊ शकतात, नेदरलँड्समध्ये या नेटवर्कची चाचणी झाली तेव्हा एकेएकी ३०० हून अधिक पक्षी मृत्युमुखी पडल्याची घटना घडली होती. जागतिक आरोग्य संघटनेने रेडीओ फ्रिक्वेन्सीच्या संपर्कात आल्यास शरीर तापमान वाढते मात्र ही वाढ मामुली असेल तर ती शरीराला अपायकारक नाही असे जाहीर केले असले तरी शरीर तापमान वाढते आणि ते जास्त प्रमाणात असेल तर अपायकारक आहे असे त्यातून सूचित झाले आहे.

बेल्जियम, नेदरलँड्स देशांनी ५ जी बाबत सावधानतेची भूमिका घेतली आहे तर स्वित्झर्लंडने ५ जी नेटवर्कचे काय परिमाण होतील याचे संशोधन हाती घेतले आहे. अमेरिका, चीन आणि भारत देशांनी मात्र लवकरात लवकर हे नेटवर्क कसे सुरु करता येईल यासाठी प्रयत्न चालविले आहेत.

Leave a Comment