दुबई विमानतळावर भारतीय चलनात करता येणार खरेदी


दुबईला कामानिमित्ताने अथवा पर्यटनासाठी जाणाऱ्या भारतीयांसाठी एक खास खबर आहे. दुबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर ड्युटी फ्री दुकानात आता भारतीय चलनात खरेदी करता येणार आहे. भारतीय प्रवासी मोठ्या संख्येने सौदीला जातात त्यामुळे दुबई विमानतळावर तीन टर्मिनल्समध्ये भारतीय चलन स्वीकारले जात असल्याचे वृत्त गल्फ न्यूजने दिले आहे. यामुळे दुबईला जाणाऱ्या भारतीयांना मोठाच दिलासा मिळाला आहे.


भारतीय चलन स्वीकारण्याच्या निर्णयामुळे खरेदी करताना अगोदर चलन बदलून घेण्याची गरज राहणार नाही तसेच मनी एक्स्चेंज चार्ज मधून ग्राहकाला सूट मिळणार आहे. आकडेवारी सांगते गेल्या वर्षात दुबई विमानतळावर ९ कोटी प्रवासी जगभरातून आले त्यात भारतीयांची संख्या १ कोटी २२ लाख होती. यापूर्वी ड्युटी फ्री दुकानात खरेदी करताना आपले चलन डॉलर, दिनार अथवा युरो मध्ये बदलून घ्यावे लागत असे. आता दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर स्वीकारल्या जाणाऱ्या चलनात भारतीय चलन १६ वे ठरले आहे.


खलीज टाईम्सच्या रिपोर्टनुसार २०१८ मध्ये ड्युटी फ्री दुकानातून दुबई विमानतळावर भारतीय प्रवाशांनी २ कोटी डॉलर्सहून अधिक रकमेची खरेदी केली आहे. हे प्रमाण एकूण व्यवसायाच्या १८ टक्के आहे. दुबई विमानतळावर ड्युटी फ्री दुकानातून ४७ देशातून आलेले सुमारे ६ हजार कर्मचारी काम करत आहेत. दुबईला भेट देणाऱ्यात भारतीयांचे प्रमाण मोठे असून २०१८ मध्ये १ कोटी ६० लाख आंतरराष्ट्रीय ओव्हर नाईट व्हिजिटर्स मध्ये २० लाख भारतीय आहेत. ही आकडेवारी दुबई पर्यटन मंडळाने दिली आहे.

Leave a Comment