आली हायपरफॉर्मंस इलेक्ट्रिक मोटरबाईक व्हेक्टर


जगभरात सर्वत्र इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन दिले जात असल्याने बाजारात हायपरफॉर्मंस इलेक्ट्रिक वाहने मोठ्या प्रमाणावर येऊ लागली आहेत. ब्रिटनच्या आर्क (ARC) स्टार्टअप कंपनीने जुलै ४ ते ७ या काळात साजऱ्या होत असलेल्या गुडवूड फेस्टिव्हल ऑफ स्पीड साठी प्रथमच व्हेक्टर लिमिटेड एडिशन इलेक्ट्रिक मोटरबाईक लोकांसमोर आणली आहे. विशेष म्हणजे कंपनीचे सीईओ मार्क ट्रुमन पहाडावर ही बाईक चालवून या बाईकचा परफॉर्मंस दाखविणार आहेत.

या लिमिटेड एडिशन इलेक्ट्रिक मोटरबाईकची फक्त ३९९ युनिट बनविली जाणार आहेत. या बाईकला ३९९ व्होल्टची इलेक्ट्रिक मोटर बसविली गेली असून ती ४० मिनिटात पूर्ण चार्ज होते. एकदा फुलचार्ज झाल्यावर ही बाईक ४३६ किमी अंतर तोडू शकणार आहे. ० ते १०० किमीचा वेग ती ३.२ सेकंदात घेईल आणि तिचा सर्वाधिक वेग आहे ताशी २०० किमी. ही जगातील मोस्ट अडव्हांस्ड बाईक असेल असा दावा कंपनीने केला आहे.


व्हेक्टर इलेक्ट्रिक बाईकला अडव्हांस्ड एलइडी हेडलाईट, क्लचलेस सिंगल गिअर ट्रान्समिशन, एबीएस, ट्रॅक्शन कंट्रोल, रायडींग मोडस असे अनेक खास फीचर्स दिले गेले आहेत. ही बाईक हँड क्राफ्टेड आहे. २०२० च्या पहिल्या सहामाहीत बाजारात येईल. बाईकची किंमत असून जाहीर केली गेली नसली तरी ती साधारण ८० लाखाच्या आसपास असेल असे सांगितले जात आहे. कंपनीचे सीइओ मार्क यांच्या म्हणण्यानुसार गुडवूड फेस्टिव्हल ऑफ स्पीड ही आमची इलेक्ट्रिक बाईक सादर करण्यासाठी योग्य वेळ असून ज्या कोणाकडे ही बाईक असेल त्यांना ती अभिमानाची ठरेल. आम्ही युनिक ऑल इलेक्ट्रिकल गिओ कॅफे रेसर सादर केली आहे आणि तिचे डिझाईन आणि उत्पादन इंग्लंडमध्येच केले गेले आहे.

Leave a Comment