व्हिडीओ ; तब्बल सहा लाख बॉटल्स वापरुन बनवण्यात आला हा आशियाना


आजवर तुम्ही दगड, वीटा, सिमेंट, वाळू आणि बरेच काही वापरुन घर बांधताना पाहिले असेल. पण तुमच्या कधी ऐकण्यात प्लास्टिकच्या बाटल्यांपासून घर बांधल्याचे आले आहे का? नाही ना… पण आज आम्ही तुम्हाला चक्क प्लास्टिकच्या बाटल्यांपासून घराबद्दल सांगणार आहोत. हे घर कॅनडामध्ये बांधण्यात आले असून हे घर सध्या पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरत आहे. हे घर तब्बल 6 लाख प्लास्टिकच्या बाटल्यांचा पुर्नवापर करुन बांधण्यात आले आहे.

हे घर कॅनडाच्या मेटागन नदीच्या किनारी बांधण्यात आले असून, यात तीन खोल्या आहेत. त्याचबरोबर एक स्वयंपाक घर आणि न्हाणीघर देखील आहे. हे घर जर बाहेरुन पाहिले तर ते खूपच साधारण वाटते. पण तेच जर आतून पाहिले तर ते खूपच आलिशान वाटते. कारण यात एका आलिशान घरासारख्या सगळ्याच अत्याधुनिक सुविधा आहेत.

जोएल जर्मन आणि डेविड सउलनिर नावाच्या कंपनीने मिळून हे अनोखे घर तयार केले आहे. कंपनीनुसार, खासप्रकारच्या फोमपासून या घराच्या भिंती तयार करण्यात आल्या आहेत. पीईटी असे याला म्हटले जाते. हा फोम तयार करण्यासाठी प्लास्टिक कचरा रिसायकल करून एक आकार देण्यात आला आहे.

कंपनीनुसार, १५ सेंटीमीटर म्हणजे ५.९ इंच जाड घराच्या भींती आहेत. कठोरातल्या कठोर वातावरणाचा सामना या भींती करू शकतात. त्याचबरोबर घराच्या भींती ३२६ मैल प्रति तासाच्या वेगाने वाहणाऱ्या हवेचा माराही सहन करण्यात सक्षम आहेत. केवळ १४ तासांचा कालावधी हे घर उभारण्यासाठी लागला. तर तब्बल ७५ लाख रूपये यासाठी खर्च करण्यात आले. या घरात सोफा, बेड, टेबलसारख्या सुविधाही आहेत.

Leave a Comment