त्रिशालाच्या बॉयफ्रेंडचे आकस्मिक निधन


२ जुलै रोजी संजय दत्तची मुलगी त्रिशाला हिच्या बॉयफ्रेंडचे आकस्मिक निधन झाले असून त्रिशालाने याबद्दलचे दुःख व्यक्त करत एक पोस्ट शेअर केली आहे. दोघांमध्ये असलेले घट्ट नाते या भावनिक पोस्टवरून दिसून येत आहे.

त्रिशालाने आपल्या पोस्टमध्ये माझे हृदय तुटले आहे. माझ्यावर प्रेम करण्यासाठी, नेहमी माझ्यासोबत उभा राहण्यासाठी आणि माझी काळजी घेण्यासाठी आभारी आहे. आयुष्यात कधीही मिळाला नसेल एवढा आनंद तू मला दिला. तुला भेटून मी या जगातील सर्वात भाग्यवान मुलगी झाले. तू कायम माझ्यात जिवंत राहशील. मी तुझ्यावर प्रेम करते आणि तुला खूप मिस करेल, जोपर्यंत आपण पुन्हा भेटत नाही. नेहमी तुझीच…बेला मिया, असे म्हटले आहे. त्रिशाचा बॉयफ्रेंड हा इटालियन होता. त्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, हे अद्याप समजू शकले नाही. संजयची पहिली पत्नी ऋचा शर्माची त्रिशाला ही मुलगी आहे. फॅशन इंडस्ट्रीमध्ये ती सध्या आपले नशीब आजमावत आहे.

Loading RSS Feed

Leave a Comment