सॅमसंगचा स्मार्टफोन अपडेट करताना होत आहे फसवणूक


जर तुम्ही सॅमसंगचा स्मार्टफोन वापरत असाल तर कधीना कधी अपडेट नक्कीच केले असेल. सॅमसंगचा स्मार्टफोन असो अथवा दुसरा कोणताही जर फोन जुना असेल तर त्यावर अपडेट एकतर उशिरा येते अथवा येतच नाही. अनेक अ‍ॅप्स आणि वेबसाईट याच गोष्टींचा फायदा घेत वापरकर्त्याला फसवूण त्यांचा डाटा चोरी करत आहे.

गुगल प्ले स्टोअरमध्ये देखील एक असा अ‍ॅप आहे ज्याचा दावा आहे की, त्या अ‍ॅपला डाऊनलोड केल्यानंतर सॅमसंग स्मार्टफोन वापरणारे स्मार्टफोनला अपडेट करू शकतात. Update for Samsung – Android Update Versions असे या अ‍ॅपचे नाव आहे. या अ‍ॅपला आतापर्यंत जवळपास 1 करोड वापरकर्त्यांनी डाऊनलोड केले आहे.

हे अ‍ॅप अपडेट देण्याची खात्री देते. डाऊनलोड केल्यानंतर हे अ‍ॅप अपडेटसाठी अशा पेजवर घेऊन जाते, जेथे अपडेट करण्यासाठी पैसे घेतले जातात. तसेच डाटा देखील चोरी करते.

सिक्युरिटी रिसर्चर आणि मालवेअर विश्लेषक अ‍ॅलेक्सेझ कुरिन्स यांनी सांगितले की, वापरकर्ते अपडेटसाठी अधिकृत प्ले स्टोअरवरच जातात त्यामुळे त्यांना चुकीचे समजणे योग्य ठरणार नाही. कंपन्या अँड्रॉइडमध्ये अनेक सॉफ्टवेअर देतात ज्यामुळे वापरकर्ते गोंधळतात. हे अ‍ॅप अजूनही गुगल प्ले स्टोअरवर असून, या अ‍ॅपला हटवण्याबाबत गुगलला माहिती दिली असल्याचे त्यांनी सांगितले.

माहितीसाठी की, अँड्रॉइड स्मार्टफोन्स अथवा आयफोन अपडेट करण्यासाठी प्ले स्टोअर किंवा अ‍ॅप स्टोअरवर जाण्याची गरज नसते. मात्र अनेक वापरकर्ते अपडेटसाठी अ‍ॅप डाऊनलोड करता जेणेकरून त्यांची फसवणूक होते.

Leave a Comment