नवी दिल्ली – मोदी सरकारने आज आपल्या दुसऱ्या टर्ममधील पहिला अर्थसंकल्प सादर केला असून आपल्या पहिल्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मध्यम वर्गाला मोठा दिलासा दिला. गरिबांना घरखरेदीत सवलत दिली असून श्रीमंतासाठी करदर वाढविले आहेत. तसेच, आयकर परताव्यासंदर्भातही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.
मोदी 2.0 ; आयकर भरताना आधार कार्ड देखील धरले जाईल ग्राह्य
अनिवासी भारतीयांना केंद्र सरकारकडून आधार कार्ड देण्यात येणार असल्यामुळे परदेशातील भारतीय नागरिकांना दिलासा मिळाला आहे. अर्थसंकल्पात गरिबांचा विचार करुन अनेक तरतुदी अन् योजना सीतारमण यांनी राबविल्या आहेत. आयकर परताव्याची प्रक्रियाही सुलभ करण्यात आली आहे. आयकर फाईल करण्यासाठी आता पॅन कार्डची गरज असणार नाही. पॅनकार्ड आणि आधार कार्डला इंटर चेंजेबल त्यासाठी करण्यात आल्यामुळे आधार कार्डच्या सहाय्यानेही आता आयकर परतावा करता येईल.
आयकर भरणाऱ्या नागरिकांसाठी सुविधा देण्यावर सरकारचा जोर असल्याचे सीतारमण यांनी सांगितले. तसेच कोणताही कर पाच लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर नसण्याची फेब्रुवारीमध्ये दिलेली सवलत कायम ठेवण्यात आली आहे. उच्च उत्पन्नाच्या करदात्यांवर मात्र अधिभाराचा बोजा वाढणार आहे. 2 कोटी ते 5 कोटी रुपये वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांकडून 3 टक्के अतिरिक्त सरचार्ज आकारण्यात येणार आहे. तर 5 कोटींपेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्यांना 7 टक्के अतिरिक्त सरचार्ज लावण्यात आला आहे.