600 भ्रष्ट सरकारीबाबूंना नारळ देणार योगी सरकार


नवी दिल्ली – भ्रष्टाचाराविरोधात उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मोठी कारवाई सुरु केली असून उत्तर प्रदेश सरकारने केंद्र सरकारकडे राज्यातील भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या आयएएस व आयपीएस 600 अधिकाऱ्याची यादी पाठवली आहे.

भ्रष्टाचार पूर्णपणे निपटून काढण्यासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी एका फटक्यात अधिकाऱ्यांची सक्तीची सेवानिवृत्ती तसेच खात्यातील भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारला यासंबधीत भ्रष्ट अधिकाऱ्यावर कारवाई करण्याचा अधिकार नसल्यामुळे या अधिकाऱ्यांची यादी त्यांनी केंद्र सरकारकडे पाठवली आहे. त्यानुसार 600 अधिकाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात येणार असून यात 200 पेक्षा अधिक अधिकाऱ्यांना सक्तीची सेवानिवृत्ती तर 400 अधिकाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.

Leave a Comment