संजय माजरेकरांना जडेजाने चांगलेच झापले


मुंबई : भारतीय संघाचे माजी क्रिकेटपटू आणि समालोचक संजय मांजरेकर यांच्या भारतीय क्रिकेटपटूंवर टीका करणे चांगलेच अंगाशी आले आहे. मांजरेकर यांनी विश्वचषकात इंग्लंडविरुद्ध भारताच्या पराभवानंतर काही खेळाडूंवर निशाणा साधला होता. यानंतर संजय मांजरेकर यांना टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाने चांगलेच झापले आहे. ट्विटरवर जडेजाने आपला रोष व्यक्त केला.

भारताचा 30 जून रोजी इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात 31 धावांनी पराभ झाला होता. विश्वचषकातील भारताचा हा पहिला पराभव ठरला. फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर यांनी या पराभवानंतर बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात रवींद्र जडेजाच्या समावेशाचे संकेत दिले होते.

परंतु संजय मांजरेकर यांनी जडेजाच्या संघात सामील होण्याच्या वृत्तावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, तुकड्यांमध्ये परफॉर्म करणाऱ्या खेळाडूंना प्लेईंग इलेव्हनमध्ये पाहू शकत नाही. तुकड्या-तुकड्यांमध्ये परफॉर्म करणारे खेळाडू मला आवडत नाही, जसा की सध्या रवींद्र जडेजाचा वनडेतील परफॉर्मन्स. मला एकतर गोलंदाज किंवा फलंदाज आवडेल.


रवींद्र जडेजा संजय मांजरेकर यांच्या कमेंटवर भडकला. ट्वीट करुन त्याने मांजरेकर यांना खडेबोल सुनावले. संजय मांजरेकर यांना मेंशन करुन जडेजाने लिहिले की, तुमच्यापेक्षा मी नक्कीच दुप्पट सामने खेळलो आहे आणि अजूनही खेळत आहे. ज्यांनी काही कमावले आहे, अशा लोकांचा आदर करायला शिका. मी तुमच्या ‘व्हर्बल डायरिया’ बाबत खूप ऐकले आहे.

दरम्यान, यंदाच्या विश्वचषकात एकही सामना रवींद्र जडेजाने खेळलेला नाही. पण बदली खेळाडू म्हणून त्याने चांगले क्षेत्ररक्षण केले आहे. 151 वन डे सामन्यात त्याने भारताचे प्रतिनिधित्त्व करुन 2035 धावा केल्या असून 174 विकेट्स घेतल्या आहे. तर मांजरेकर यांनी 74 वनडे सामन्यात 1994 धावा केल्या असून एक विकेट घेतली आहे.

Leave a Comment