पाकिस्तानने दाखल केला हाफिज सईदविरोधात गुन्हा


इस्लामाबाद – पाकिस्तानातील पंजाब प्रांतात जमात-उद-दावा संघटनेचा म्होरक्या हाफिज सईद आणि आणखी काहीजणांविरोधात दहशतवादी कारवायांसाठी पैसा पुरवल्याबद्दल गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हाफिज सईदवर लाहोर, गुजरंजनवाला आणि मुल्तान येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भातील वृत्त पाकिस्तानी माध्यमांनी दिले आहे.

हाफिज सईदवर अल अन्फाल ट्रस्ट, दावत उल ईर्शाद ट्रस्ट यांसारख्या स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून निधी गोळा करून दहशवादी कारवायांसाठी पैसा वापरल्याचाही आरोप ठेवण्यात आला आहे. पाकिस्तान सरकारने याप्रकरणी कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे. त्याचबरोब त्याच्यावर अनेक निर्बंध लादण्यात आले आहेत. पाकिस्तान सरकारच्या या कारवाईमुळे दहशवादी संघटनांविरुद्ध पाकिस्तान सरकार कठोर निर्णय घेत असल्याचे दिसून येत आहे.

Leave a Comment