चेहऱ्यावरील भाव ओळखणाऱ्या प्रणालीची मुंबई पोलीस घेणार चाचणी !


कोणत्याही देशातील पोलिसांसाठी वाढती गुन्हेगारी ही डोके दुखी ठरत असून त्यात एवढे कष्ट करुन एखाद्या आरोपीला पकडले तर तो खरे बोलत आहे की खोटे हे तपासणे मोठे अवघड काम असेत. पोलिसांचा बराच वेळ आणि एनर्जी एखाद्या प्रकरणाच्या चौकशी दरम्यान खर्च होते. याच पार्श्वभूमीवर उपाय म्हणून गुन्हेगाराच्या चेहऱ्यावरील हावभाव पाहून गुन्हेगार खरे बोलत आहे की खोटे हे सांगणारी प्रणाली विकसित करण्यात आली आहे. या आर्टिफिशियल इन्टेलिंजेंस सिस्टम (Artificial Intelligence Systems) एआय टेक्नॉलॉजीच्या संभाव्य व्यावहारिक अनुप्रयोगांबद्दल चाचणी घेण्यासाठी कंपनी यूके आणि मुंबई पोलिसांशी संपर्कात असल्यामुळे मुंबई पोलीस लवकरच या प्रणालीची चाचणी घेण्याची शक्यता आहे.

चेहरा स्कॅनिंग तंत्रज्ञान मायक्रो-एक्सप्रेशन्सवर हे काम करते. ही प्रणाली अगदी लहान, ओळखताही न येणारे चेहऱ्यावरील भाव ओळखते. ज्यामुळे कोणी जर का खोटे बोलत असेल अथवा सत्य लपवून ठेवण्याचा प्रयत्न करत असेल, तर तो भाव ही प्रणाली पकडू शकणार आहे. अशाप्रकारची प्रणाली लंडनस्थित स्टार्टअप फेससॉफ्ट यांनी विकसित केली आहे. या प्रणालीमध्ये तब्बल 300 दशलक्ष विविध हावभाव समाविष्ट केले आहेत. या डेटाबेसच्या आधारावर सूक्ष्म भावदेखील ओळखता येणार आहेत.

डोक्यातील विचार आणि चेहऱ्यावरील हावभाव यांचा संबंध 1960 च्या दशकात पहिल्यांदा जोडला गेला. ही गोष्ट आत्महत्या करणाऱ्या पेशंट्समध्ये आढळली होती. सर्व वयोगटातील आणि सर्व लिंगाच्या लोकांचे हावभाव आता विकसित केलेल्या या प्रणालीमध्ये समाविष्ट केले गेले आहेत. जेणेकरून ही प्रणाली गुन्हेगारांच्या डोक्यात चाललेले विचार त्यांच्या चेहऱ्यावरील हावभावाद्वारे ओळखू शकेल.

Leave a Comment