अंबाती रायडूला या देशाची खुली ऑफर…तू आमच्याकडून खेळ


नवी दिल्ली – टीम इंडियाला या विश्वचषक स्पर्धेदरम्यान दुखापतीचे ग्रहण लागलेले आहे. सर्वात आधी सलामीवीर शिखर धवन जायबंदी झाला त्यानंतर विजय शंकरच्या दुखापतीमुळे टीम इंडियाच्या समस्येत आणखीनच वाढ झाली. त्यानंतर शंकरच्या जागी मयंक अगरवालला अनपेक्षितरित्या वर्णी लागली. पण यादरम्यान फलंदाज अंबाती रायडूचा विचार न केल्याने सर्वांच्याच भूवया उंचावल्या होत्या, पण एक संघ रायडूला खेळवण्यास कमालीचा उत्सूक आहे.


रायुडूला आपल्या संघाकडून खेळण्याची आईसलँड क्रिकेट संघाने ऑफर दिली आहे. शिवाय, आईसलँड देशाचे नागरिकत्व स्वीकारण्यासाठी कोणत्या कादगपत्रांची गरज लागते, याची माहितीही त्यांनी चक्क आपल्या ट्विटर अकाऊंटवर पाठवली आहे. फलंदाज अंबाती रायडूचे थ्री-डी गॉगलचे ट्विट खूप गाजले होते. त्याचाच आधार घेत आईसलँड क्रिकेटने हे ट्विट केले आहे. सोबत, संघात निवड झालेल्या मयंक अगरवालच्या कामगिरीचाही उल्लेख या ट्विटमध्ये आईसलँडने केला आहे.

Leave a Comment