तब्बल 6 कोटींना विकला गेला बुध्दिबळाचा एक मोहरा


2 जुलै रोजी लंडन येथे 12 व्या शतकातील बुध्दिबळाच्या एका मोहराचा लिलाव करण्यात आला. 55 वर्षांपुर्वी केवळ 5 डॉलर म्हणजेच जवळपास फक्त 415 रूपयांना खरेदी केलेल्या या मोहरेचा तब्बल 6 करोड रूपयात लिलाव करण्यात आला. या मोहरेला स्कॉटलँडच्या एका व्यक्तीने 1965 मध्ये खरेदी केले होते. 1965 पासून ही मोहर कपाटामध्येच ठेवण्यात आली होती. मागील महिन्यात या मोहरेला बाहेर काढण्यात आले. आर्ट डीलर कंपनी सोदबीच्या माध्यमातून याचा लिलाव करण्यात आला असून, खरेदी करणाऱ्याचे नाव मात्र स्पष्ट करण्यात आलेले नाही.

कुटूंबाच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, मागील 55 वर्षांपासून ही मोहर कपाटामध्येच ठेवण्यात आली होती. आजोबांच्या निधनानंतर आजींनी हे वारसा रुपात हे परिवाराला दिले होते.

बुद्धिबळाचा हा मोहरा 3.5 इंच लांब असून, दाढी असणाऱ्या व्यक्तीच्या या मोहराच्या उजव्या हातात तलवारीसारखे हत्यार आणि डाव्या हातात ढाल आहे. या परिवाराला लिलावामध्ये 7 करोड रूपये मिळण्याची आशा होती. मात्र त्यांना 6 करोड रूपये मिळाले.

माहितीनुसार, बुद्धिबळाचा हा मोहरा 1831 मध्ये सापडलेल्या 93 मोहरांपैकी एक आहे. या सर्व 93 मोहरांना 12 व्या किंवा 13 व्या शतकात बनवण्यात आले असून, या मोहरा वॉलरसच्या दातापासून बनवण्यात आलेल्या आहेत. या 93 मोहरांपैकी 82 लंडनच्या म्युझियममध्ये आणि 11 स्कॉटलँडच्या राष्ट्रीय म्युझियममध्ये ठेवण्यात आलेले आहे. यांसारख्या आणखी 5 मोहरा आजही गायब आहेत.

Leave a Comment