43 वर्षांची ही बॉलिवूड अभिनेत्री राहाते लिव्ह इनमध्ये, आहे अडीच वर्षांच्या मुलीची आई


आपल्या पर्सनल लाइफला सीक्रेट ठेवणे बॉलिवूड अभिनेत्री माही गिलने नेहमीच पसंत केले. पण एका इंटरव्यूमध्ये आता तिने आपल्या पर्सनल लाइफबद्दल काही खास गोष्टी शेअर केल्या आहेत. 43 वर्षीय माहीने त्या मुलाखतीत सांगितले की, ती एका मुलीची आई असून ती लिव्ह इनमध्ये राहाते.

माहीने आपला आगामी चित्रपट ‘फॅमिली ऑफ ठाकुरगंज’च्या प्रमोशनसाठी दिलेल्या एका इंटरव्यूमध्ये सांगितले, माझा एक बॉयफ्रेंड आहे. तो कॅथोलिक नाही. गोव्यामध्ये तो राहातो आणि एक बिजनेसमन आहे. आम्हाला लग्न करायचे आहे पण याने काहीही फरक पडत नाही. लग्नासाठी कोणत्याही प्रकारचा दबाव आमच्यावर नाही. मला स्वातंत्र्य आणि आपली स्पेस पाहिजे. स्वातंत्र्य आम्हा दोघांसाठी गरजेचे आहे. आम्ही एकमेकांचा आदर करतो आणि प्रेमही करतो. सन्मान प्रत्येक नात्यात गरजेचा असतो आणि आम्हाला वाटते हे नाते पुढे नेण्यासाठी गरजेचे आहे. आम्ही लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये आहोत. आम्ही लग्न केले नाही पण भविष्यात नक्कीच लग्न करू.

मला एक मुलगी आहे जी अडीच वर्षांची आहे. व्हेरोनिका असे तिचे नाव असून मुंबईमध्ये माझी काकू तिला सांभाळतात. मी सुद्धा मुंबईमध्ये जास्तीत जास्त वेळ घालवते. माहीने ‘देव डी’, ‘गुलाल’, ‘साहेब बीवी और गँगस्टर’, ‘साहेब बीवी और गँगस्टर 2’, ‘दबंग’ यांसारख्या चित्रपटात काम केले आहे.

Leave a Comment