सोनाराने बनविली वर्ल्ड कपची चिमुकली प्रतिकृती


इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या आयसीसी वर्ल्ड कपचा वाढत चाललेला रोमांच आणि टीम इंडियाचा उपांत्य फेरीपर्यंत चाललेला धडाकेबाज प्रवास पाहता टीम इंडिया यंदाच्या वर्षी वर्ल्ड कप जिंकू शकेल अशी आशा क्रिकेट रसिकांच्या मनात पालवली आहे. या पार्श्वभूमीवर बंगलोर मधील सोनार नागराज रेवणकर यांनी वर्ल्ड कप ट्रॉफीची चिमुकली प्रतिकृती सोन्यात साकारली असून ती सोशल मिडीयावर चांगलीच चर्चेत आली आहे. त्यांची ही कलाकृती बघण्यासाठी त्यांच्या दुकानात लोक गर्दी करत आहेत आणि ट्रॉफी पाहून आनंद व्यक्त करत आहेत.


नागराज यांनी अवघ्या ०.४९ ग्राम म्हणजे साधारण अर्धा ग्रॅम सोन्यात ही १.५ सेंटीमीटर उंचीची प्रतिकृती अतिशय सुबकपणे बनविली आहे. त्याचे फोटो त्यांनी सोशल मिडीयावर शेअर केल्यावर त्यावर प्रतिक्रियांचा वर्षाव झाला आहे. नागराज सांगतात, टीम इंडियाच्या गुडलक साठी ही ट्रॉफी साकारावी असे मनात आले. यंदा भारताने वर्ल्ड कप जिंकावा अशी माझी इच्छा आहेच पण टीम इंडियाला सपोर्ट मोठ्या प्रमाणावर मिळावा यासाठी ही ट्रॉफी बुधवारी लोकांसमोर सादर केली. आपल्या हाताच्या बोटावर ती सहज मावते पण चुकून जमिनीवर पडली तर एकाच नजरेत ती दिसणारही नाही इतकी ती छोटी आहे. सोशल मिडीयावर या ट्रॉफीची खूप तारीफ होते आहेच पण ज्यांनी प्रत्यक्ष ती पाहिली त्यांनीही आनंद व्यक्त केला आहे.


टीम इंडियाने वर्ल्ड कप मध्ये आत्तापर्यंत आठ सामने खेळून १३ पॉइंट कमावले आहेत आणि ती दुसऱ्या नंबरवर पोहोचली आहे. टीम इंडिया एकच सामना हरली असून मंगळवारी बांगलादेश देश बरोबरच सामना जिंकली आहे. आता त्यांची गाठ ६ जुलैला श्रीलंकेबरोबर पडणार आहे.

Leave a Comment